Beed News: मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली न लागल्यास या वेळी इतिहास घडवणार. मुंबईत जाणारच, आरक्षण मिळविल्याशिवाय परतायचे नाही. सरकार कितीही अडथळे आणो, पोलिस कितीही ताकद लावोत, आता मागे फिरायचे नाही. मुंबई आमची आहे, राज्य आमचे आहे आणि हक्काचे आरक्षणही आमचेच आहे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. .तालुक्यातील मांजरसुंबा येथे रविवारी (ता. २४) झालेल्या सभेत जरांगे पाटील बोलत होते. या वेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी जरांगे पाटील म्हणाले, की आंदोलन शांततेत करून आरक्षण मिळवायचे आहे. उद्रेक, जाळपोळ, दगडफेक मान्य नाही. असा प्रकार करणारे आपले नाहीत..Manoj Jarange Patil: मनोज जरांगे २९ ऑगस्टला मुंबईत; सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन.ते म्हणाले, की बुधवारी (ता. २७) अंतरवलीतून निघणार आणि शुक्रवारी (ता. २९) मुंबई गाठणार, गणपती बाप्पाला सोबत घेऊन लढाईला पूर्णविराम देऊ. मुंबईत मराठ्यांना येऊ द्यायचे नाही, यासाठी काहींचे षड्यंत्र सुरू आहे, पण आपण मुंबईत घुसणारच. मराठा समाज शांततेने आंदोलन करणार आहे. दगडफेक, जाळपोळ, तोडफोड करणारे आपले नाहीत. अशांना पकडून पोलिसांच्या हवाली करा. आंदोलनाचा उद्देश फक्त हक्काचे आरक्षण आहे..Manoj Jarange Patil : मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हा.सरकारवर टीका करताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री इतर नेत्यांना कोपरांनी मारतात. पण समाजाचा प्रश्न सोडवत नाहीत. त्यांनी २९ जातींना ओबीसीत घेतले, मग मराठा समाजाला का डावलले? हैदराबाद गॅझेट लागू का करत नाहीत? कुणबी नोंदी सापडल्या तरी अंमलबजावणी होत नाही..मराठा समाजाबद्दल एवढी खुन्नस का? मराठ्यांचा प्रश्न सुटला तर त्यांचा खोटा राजकीय डाव उघड होईल, अशी भीती सरकारला आहे. मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण ते होऊ देणार नाही. चार महिन्यांपासून मागणी करतोय. आता आरक्षणाशिवाय माघार नाही. ते मिळाले नाही तर भाजप आमदारांना गावात फिरू देणार नाही. मुंबईत त्रास दिला तर राज्य बंद करू..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.