Pune News : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे, धामणी, पहाडदरा परिसरात मे, जून, जुलै या महिन्यांत चांगला पाऊस झाला. परंतु मागील तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. बटाटा, वाटाणा, मका, सोयाबीन तसेच इतर नगदी पिके धोक्यात आली होती. परंतु मागील आठवड्यापासून परतलेल्या संततधार पावसाने सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत..शिरदाळे परिसरात पावसाळी बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. बटाटा पीकदेखील अंतिम टप्प्यात आले असून ऐन फळ लागण्याच्या काळात पावसाने उघडीप दिली होती. काही शेतकऱ्यांनी बटाट्याला पाणी भरण्यास सुरुवात केली होती, परंतु पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..Potato Seed : राज्यात चार विद्यापीठे असूनही बटाटे बियाणे निर्मितीच होत नाही.शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध व्यवसायदेखील शिरदाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्व पशुधन रानात चरण्यासाठी जात असतात परंतु पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे चारादेखील वाळला होता पण आता या पावसाने चारादेखील चांगला होणार आहे. परिणामी दूध उत्पादनातदेखील वाढ होणार असल्याचे अनिकेत चौधरी, भुपेंद्र तांबे, शुभम तांबे, संतोष तांबे, तुषार रणपिसे या शेतकऱ्यांनी सांगितले..Potato Farming: सातगाव पठार परिसरात बटाटा लागवड खोळंबली.या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाने चांगली सुरुवात केली आहे. मध्यंतरी भरपूर झालेला पाऊस यामुळे पाणवठेदेखील चांगल्या प्रमाणात भरलेले आहेत. सर्व पिके आता अंतिम टप्प्यात असून वेळेवर झालेल्या पावसामुळे सर्वच पिकांना याचा फायदा होणार आहे. शिवाय आगाप बटाटा लागवड झालेले बटाटे आता अंतिम टप्प्यात आहेत..त्यामुळे त्यासाठी हा पाऊस जास्त पोषक असून याच पावसावर आता पीक निघणार असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी संदीप तांबे, निवृत्ती मिंडे, केरभाऊ तांबे, कांताराम तांबे, बाबाजी चौधरी, राघू रणपिसे, बाळासाहेब तांबे, गोरक्ष तांबे यांनी सांगितले. या पावसाचा मका, सोयाबीन, वाटाणा अशा पिकांनादेखील फायदा होणार असल्याचे सरपंच सुप्रिया तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी, माजी सरपंच वंदना तांबे, माजी उपसरपंच उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.