Pune News: वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील कैलास वामन कोलते यांनी सेंद्रिय खते औषधे तसेच सीताफळाच्या बागेचे योग्य व्यवस्थापन करून भरघोस उत्पादन घेतले आहे. सध्या एक नंबर सीताफळाच्या एका डझनाला वाशी येथील बाजारापेठेत सहाशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, तर छोट्या फळांच्या एक डझनच्या जोठ्याला दोनशे ते अडीचशे रुपये दर मिळत आहे..दोन वर्षांपूर्वी कोलते यांनी रघुनाथ लेंडे यांचा सहा वर्षांचा दीड एकर बाळानगर जातीच्या सीताफळाची ६०० झाडे असलेला बाग खंडाने (मकत्याने) घेतला होता. त्या वेळी फळांची गुणवत्ता व आकारही सर्वसाधारण होता. मात्र, यंदा कोलते यांना सतीष कुटे यांनी योग्य मार्गदर्शन केले..Custard Apples Disease: सीताफळातील फळसड, स्टोन फ्रूट लक्षणे अन् उपाय.सीताफळावर पडणारे मिलिबग, बुरशी, काळे डाग या रोगांपासून बचाव झाला तसेच फळांचा आकारही मोठा मिळाल्यामुळे त्यांना या वर्षी बागेत अधिक उत्पादन मिळाले आहे. श्री. कोलते यांनी सांगितले, की यंदा योग्य व्यवस्थापनामुळे एका झाडाला दीड ते दोन किलोपर्यंत फळे निघत आहेत..Custard Apple Crop Management : सीताफळ काळे पडण्यामागील कारणे, उपाययोजना .मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी फळाच्या आकारात व गुणवत्तेतही वाढ झाली आहे. ते म्हणाले, की सीताफळ बागेला खालून पाट पाणी देत असून सतीष कुटे यांनी सीताफळ बागेचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करताना सेंद्रिय कीटकनाशके, द्रवरूप खते वापरण्याचा सल्ला दिला..सेंद्रिय खतांमुळे फळांचा भक्कमपणा व गोडपणा वाढला आहे. दर्जेदार रंग आणि रोगमुक्त फळे मिळाली. साधारण एका सीताफळाचे वजन ४०० ग्रॅमच्या आसपास असल्याने बाजारभावही चांगला मिळत आहे. फळांचे अजून दोन मोठे तोडे होणार आहेत. या वर्षी खर्च वजा जाऊन दुप्पट नफा मिळेल. कैलास कोलते, सीताफळ उत्पादक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.