Cabinet Decisions Agrowon
ॲग्रो विशेष

Cabinet Meeting : “मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करणार.…”, राज्य सरकारची मोठी घोषणा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले.

Swapnil Shinde

Cabinet Decisions : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करणार करण्याचा निर्णय घेतला.

मराठा आरक्षासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. आंदोलक आक्रमक झाले असून लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ला केल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. अशात आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर बैठकीतल्या निर्णयासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल मंत्रिमंडळाने स्विकारला. त्यानुसार कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा समाजातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.तसेच मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार करण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात टिकणार आरक्षण देण्यासाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT