Swapnil Shinde
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे.
त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.
गावागावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात आले.
सोमवारपासून मराठ समाज आक्रमक झाला असून मराठवाड्यात अनेक ठिकाणी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे १२ जिल्ह्यातील बससेवा बंद करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आहे. यामध्ये न्या. शिंदे यांच्या समितीला अभ्यास करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली
आरक्षणाच्या समर्थनार्थ हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, परभणीचे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर व गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिला आहे.