Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : ७५८ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मंजुरी; नव्या वर्षात वाटप होण्याची शक्यता

Dudh Anudan : राज्यातील दूध उत्पादकांना अनुदानापोटी पाच रुपये देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अनुदान देण्यात आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील दूध उत्पादकांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अनुदान देण्यात आले आहे. आता पुढील तीन महिन्यांचे पाच रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने ७५८ कोटी रुपयांच्या दूध अनुदानाला मान्यता दिली आहे. पण अद्याप निधी प्राप्त झाला नसून तो वर्ग झाल्यानंतर वाटप होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती दुग्ध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे.

सध्या पशुधन सांभाळण्यासाठी खर्च वाढत असून म्हैस आणि गायीच्या दुधाला अपेक्षित दर मिळताना दिसत नाही. यामुळे दुग्ध उत्पादक अडचणीत आले आहेत. तसेच सतत पडणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन उभारले होते. त्यावेळी या प्रश्नावरून विधानसभेत देखील विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं होते.

त्यावेळी तत्कालिन पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्या निर्णयाप्रमाणे आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे वाटप करण्यात आले आहेत. तर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे आतापर्यंत ५३७ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप झाले आहे.

आता पुढील तीन महिन्यांच्या अनुदानापोटीचे ७५८ कोटी रुपये नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहेत. हे अनुदान निधी वर्ग झाल्यानंतर वाटप केला जाईल, असे मोहोड यांनी सांगितले आहे. तर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान ६ लाख २२४ शेतकऱ्यांना थेट खात्यावर वर्ग करण्यात आले होते. जे सहकारी संघ, संस्था, प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपन्या, शीतकरण केंद्र यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक शेतकरी

जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात देण्यात आलेल्या अनुदानाचा सर्वाधिक लाभ अहिल्यानगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाला आहे. येथे जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार २९९ शेतकऱ्यांना १५२ कोटी १२ लाख ३० हजार ५९० रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

भुकटी प्रकल्पांनाही अनुदान

राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करताना दूध भुकटी व बटरचे कोसळलेले दरावर देखील भाष्य केले होते. दूध भुकटी निर्यातीसाठी ३० रुपये प्रतिकिलो किंवा रूपांतरणासाठी दीड रुपया प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आतापर्यंत एकूण ३२ खासगी व सहकारी प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे.

यापैकी १३ दूध भुकटी प्रकल्पांनी माहिती अपलोड केल्यामुळे त्यांना २६ कोटी ८५ लाख ७४ हजार ५४१ लिटर दुधाच्या रूपांतरणाकरिता ४० कोटी २८ लाख ६१ हजार ७९३ रुपये प्रोत्साहनपर अनुदान राज्य सरकारने दिले आहे. उर्वरित अनुदान देखील लवकरच देण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय वितरण झालेले दूध अनुदान

जिल्हा शेतकरी अनुदान

अहिल्यानगर १,७३, २९९ १५२,१२,३०५९०

छ. संभाजीनगर १४,६९२ १०५६,४४,५९०

पुणे १,४३,४६३ १७२,८१,०४,९६५

सांगली ३८,९७४ २२,३९,७४,४५०

सातारा ३७,९४६ ३९,६७,१०,३९०

सोलापूर ६०,२२५ ७५,६५,९९,६९५

जिल्हा शेतकरी अनुदान

बुलढाणा ५५९ १४,८०,६७०

कोल्हापूर ७०,२७० २६,७०,५५,६१५

अमरावती ५९४ १८,५४,२८०

नाशिक २४,६८६ १७,०५,७२,७६५

धुळे ४०१ २०,६३,०६५

जळगाव १२,५६९ ५,०८,७४,५७५

जालना १,०१३ ३१,७९,१२५

धाराशिव १०,७१७ ६,९२,२६,६४५

जिल्हा शेतकरी अनुदान

लातूर ४५७ ३३,८१,३२५

नांदेड ३६ ४६,७१०

परभणी ५६ ३,९३,५१५

नागपूर २,४६२ ७९,०३,४७५

वर्धा ३३० ५,७३,८०५

भंडारा ४९२ १७,०९,७६०

बीड ८,६३३ ६,५९,५०,०७५

एकूण ६,०२,१४४ ५३७,८५,३०,०८५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT