Milk Subsidy : दूध उत्पादकांना अखेर दिलासा

Dairy Development Department : आतापर्यंत जिल्ह्यातील १७९ कोटी रुपयांचे दूध अनुदान प्रस्ताव आले असून, त्यापोटी १५६ कोटी रुपये वितरित केले आहेत. उर्वरित २३ कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी दिली.
Milk
Milk Agrowon
Published on
Updated on

Nirgudsar News : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दूध अनुदान वाटपाला ब्रेक मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दूध अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. आता आचारसंहिता उठल्यापासून दुग्ध विकास विभागाने अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १७९ कोटी रुपयांचे दूध अनुदान प्रस्ताव आले असून, त्यापोटी १५६ कोटी रुपये वितरित केले आहेत. उर्वरित २३ कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी दिली.

शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. ही योजना एक जुलैपासून सुरू झाली असून, यात पुणे जिल्ह्यातील ११८ सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांकडून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाकडे आत्तापर्यंत १७९ कोटी रुपये अनुदानाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे १५६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित २३ कोटी रुपयांचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे.

Milk
Cow Milk Subsidy : दूध अनुदानासाठी बोगस नावे असल्याचा संशय

१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्या वेळी दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी ३० रुपये दर होता. त्यानंतर १ ऑक्टोबरपासून प्रतिलिटर दोन रुपये वाढ करून सात रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी दूधदर २८ रुपये करण्यात आला आहे. अनुदान वाटपासाठी पुणे जिल्ह्यातील सहकारी, खासगी दूध संस्थांकडून प्रस्ताव आले असून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत जवळपास सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले आहे. पुढील काही महिन्यांचे वितरणही प्रस्ताव येतील त्याप्रमाणे करण्यात आले आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनुदान वाटपाला ब्रेक लागला होता.

Milk
Soya Milk Benefits : सोयाबीन दुधाचे आरोग्यदायी फायदे

या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १७९ कोटी रुपयांचे प्रस्ताव दूध विकास विभागाला प्राप्त झाले. याची वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या प्रस्तावांमधून जिल्ह्यातील १० लाख २० हजार ७७८ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८३ लाख १६ हजार ६८२ लिटर दुधाच्या अनुदानापोटी १७९ कोटी रुपयांचे वितरण होणार आहे. यात आतापर्यंत १५६ कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आले आहे. उर्वरित २३ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

अनुदान नको; दुधाला ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर दर द्या

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील शिवशंकर दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब टेमगिरे म्हणाले, की सरकारने दुधाला अनुदानापोटी जाहीर केलेल्या प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचे साधारण १६ लाख रुपये अनुदान आमच्या संस्थेला मिळाले आहे. अजून ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांसाठी प्रतिलिटर सात रुपयांप्रमाणे अनुदान प्रतीक्षेत आहेत.

अनुदानाची किती दिवस वाट पाहायची? आम्हाला उचल घेऊन खर्च करावा लागत आहे. पशुखाद्य, ओल्या चाऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सहकारी, खासगी दूध संघाना प्रतवारी चांगली लागते. त्या तुलनेत दूधदर मिळत नाही. सरकारचे अनुदान आम्हाला नको. आम्हाला ३५ ते ४० रुपये दर द्यावा.

पशुखाद्य कडाडले

साधारणतः १० दिवसांत पशुखाद्याचे दर कडाडले असून, भुस्सा, कांडी, सरकी, पेंड यांचे दर ५० किलोच्या पिशवीमागे ७० ते १०० रुपयांनी वाढले आहे. हिरव्या चाऱ्याचे दरही वाढले असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत दूधदर मिळत नाही. त्यामुळे प्रतिलिटर ४० रुपये दराची शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com