Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : गहू, हरभऱ्याच्या पेरण्या लांबणीवर

Wheat Sowing : दरवर्षी वेळेत सुरू होणारे साखर कारखाने चालू वर्षी उशिराने सुरू होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ऊसतोड मजुरांसाठी मनस्ताप सहन करणारा ठरणार आहे.

Team Agrowon

Pune News : दरवर्षी वेळेत सुरू होणारे साखर कारखाने चालू वर्षी उशिराने सुरू होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ऊसतोड मजुरांसाठी मनस्ताप सहन करणारा ठरणार आहे. समाधानकारक पाऊस होऊनही पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गहू आणि हरभरा पीक घेता येणार नसल्याने शेतकऱ्यांच्या पुढील अडचणी वाढत आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

यंदा १५ नोव्हेंबरच्या दरम्यान कारखाने सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यात अजूनही साखर कारखाने फारसे सुरू झालेले नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मात्र ऊस तुटून जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. हातावर पोट असणारा ऊस तोडणी कामगार कारखान्याकडे येण्याची तयारी करीत आहे.

साधारणपणे दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी राज्यातील साखर हंगाम सुरू होत असतो. दहा नोव्हेंबरपर्यंत हंगाम सुरळीत सुरू होतो. मात्र, यावर्षी अचानक मंत्री समितीने साखर हंगामाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यात विधानसभा निवडणुकीमुळे ऊसतोडणी कामगारांनी गाव सोडलेले नाही. आता निवडणूक झाल्याने ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर दाखल होण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे कारखाने सुरळीत सुरू होण्यासाठी दहा डिसेंबर उजाडणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने उसाची वाढ चांगली झाली आहे. बारा ते तेरा महिने होऊनही ऊस शेतात उभा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कारखान्यांचे एक लाख टनाच्या वर गाळप झाले होते. मात्र, अजून एक महिना उसाला तोडी येत नसल्याने उसाचे वजन घटून ऊस उत्पादकांचे नुकसान होणार आहे.

दुसरीकडे ३० टक्के ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पीक गेल्यानंतर त्याच शेतात गहू व हरभऱ्यासारखी पिके घेत असतो. जिल्ह्यातील काही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काही ऊसतोड कामगारांच्या टोळ्या गेल्याच आठवड्यातच दाखल झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात ऊस तोडणीसाठी त्यांना कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

उशिरा ऊस तोडणीचा रब्बीला फटका

यंदा १५ नोव्हेंबरपूर्वी ऊसतोड मजूर कारखान्यावर न आल्याने कारखान्यांनी करारबद्ध केलेले वाहतूकदार आणि मुकादम हेही अडचणीत येत आहेत. वाहतूकदारांनी लाखो रुपये उचल मजुरांना दिली आहे. मजूर कारखान्यावर पोहोचले नाही किंवा पळवापळवी झाली तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. येत्या काळात साखर कारखाने सुरू झाले तरी शेतकऱ्यांना गहू, हरभरा अशा पिकांच्या पेरण्या करणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे.

दरवर्षी वेळेत साखर कारखाने सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी गहू, हरभरा अशा पिकांच्या पेरण्या करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. चालू वर्षी उशिराने ऊस तोडणी सुरू झाली असल्याने पेरण्यांनी उशिराने होणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसून उत्पादनात काहीशी घट येऊ शकते.
- रामचंद्र नागवडे, कृषिभूषण शेतकरी, बाभूळसर, शिरूर, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीसाठी २ हजार ४८१ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Dragon fruit Processing : ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रिया उत्पादने

Fish Production : सुधारित मत्स्य प्रजाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर

Eknath Shinde Resign : एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांचा राजीनामा; १४ व्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार

Fodder Crop Cultivation : पोषक चारा उत्पादनाचे नियोजन...

SCROLL FOR NEXT