Satara News: कारखान्याची विस्तारवाढ वेळेत पूर्ण झाल्याने गेल्या वर्षीचा गळीत हंगाम कमी कालावधीत पूर्ण केला. कारखाना कार्यक्षेत्रातील अन्यत्र होणाऱ्या उसाचे प्रमाणही कमी करून संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाने चांगले आर्थिक नियोजन करावे. कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजारांची पहिली उचल देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली..दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, अशोकराव पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, सर्जेराव जाधव, सुनील पानस्कर, बळिराम साळुंखे, विजय सरगडे, शंकरराव पाटील,.Sugar Industry: साखर कारखान्यांची यांत्रिक कामेही ‘एआय’ सांभाळणार.भागोजी शेळके, बबनराव शिंदे, लक्ष्मण बोर्गे, जयवंतराव शेलार, ॲड. डी. पी. जाधव, अभिजित पाटील, संजय देशमुख, प्रकाशराव जाधव, जालंधर पाटील, विजय जंबुरे, माणिक पवार, कार्यकारी संचालक सुहास देसाई आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘कारखान्याने १२५० वरून २५०० मेट्रिक टन गाळप क्षमता केली आहे..Sugar Industry Crisis: कपात, काटामारी अन् कारखाने.कारखान्याकडे यंदा गळितास येणाऱ्या उसाला तीन हजार रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये १२५० मेट्रिक टन गाळप क्षमतेचे अनेक कारखाने लिलावात गेले, विक्रीला निघाले; परंतु लोकनेते बाळासाहेब देसाई व शिवाजीराव देसाई यांचे आदर्श विचारांचा वारसा जोपासत आजही कारखाना आर्थिक नियोजनामुळे सक्षमपणे सुरू आहे..शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त ऊस कारखान्यास गळितास येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. ’’अध्यक्ष यशराज देसाई म्हणाले, ‘‘पहिल्यांदाच पावसाच्या वातावरणामध्ये आपण गळीत हंगामाची सुरुवात करत आहोत. मे महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणांत पडत असल्याने उसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. उसाची उपलब्धता लक्षात घेता हा गळीत हंगाम सुरू करत असताना कितीही आर्थिक ताण आला, तरी गळितास येणाऱ्या उसाला तीन हजार रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.