Jalgaon Collector Office Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Development : राज्याच्या विकासात जळगाव जिल्ह्याचा वाटा केवळ २.४ टक्के

Jalgaon Development Update : राज्याच्या विकासात जळगावचा वाटा केवळ २.४ टक्के आहे. त्यात कृषी क्षेत्राकडे बँकांचे दुर्लक्ष आहे.

Team Agrowon

Jalgaon News : राज्याच्या विकासात जळगावचा वाटा केवळ २.४ टक्के आहे. त्यात कृषी क्षेत्राकडे बँकांचे दुर्लक्ष आहे. विविध कृषी उद्योगांना प्रोत्साहन नसल्याने जिल्हा वित्तीय बाबींमध्ये मागे पडल्याची माहिती बँकांसाठी आयोजित कार्यशाळेत वरिष्ठ तज्ज्ञांनी दिली.

नुकतीच कांताई सभागृहात ही कार्यशाळा झाली. यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणवकुमार झा, ‘नाबार्ड’चे श्रीकांत झांबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, प्रवीण सिंह, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यात पारंपरिक बँकिंग आहे. सोने तारण करून कर्ज देण्याची पद्धत अनेक वर्षांपासून जळगावात आहे. सोने, केळी जळगावची ओळक आहे. यामुळे जळगावला सुवर्णनगरी म्हटले जाते. मात्र आता बँकांचा विकासात सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. जळगाव जिल्ह्यात मोठी क्षमता आहे.

डाळ, पाइप, चटई, प्लॅस्टिक उद्योगात जळगाव काम करीत असून, त्याची निर्यातही होते. जळगावची केळी परदेशात पोहोचते. परंतु कृषिसंबंधी प्रक्रिया उद्योगांनाही आर्थिक बळ हवे आहे. पूर्वी जळगावची केळी देशभरात जात होती. परंतु देशातील बाजारात जळगावची केळी कमी होत आहे.

केळी का मागे पडत आहे, याचाही विचार करायला हवा. जिल्ह्यात चांगल्या यशकथा तयार व्हायला हव्यात. माणसांना वित्तीयदृष्ट्या भक्कम करणे हे बँकांचे काम आहे. जिल्हा प्रशासन त्यासाठी बँकांना मदत करायला नेहमी तयार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

...या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज

जिल्हा नियोजन अधिकारी शिंदे यांनी सांगितले, की जिल्ह्यात रिअल इस्टेट, सोने व्यवहारात वाढ होत आहे. त्यात अधिकची उलाढाल दिसते. परंतु इतर क्षेत्रात फारशी वाढ दिसत नाही. त्यात अधोगती आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. बँकांनी त्यात भरीव काम करायला हवे, असेही शिंदे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT