Solapur News: ऊसदराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. उसाची पहिली उचल ३००० रुपयांपेक्षा जास्त जाहीर न करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या बार्शी येथील येडेश्वरी साखर कारखान्यावर शेतकरी संघटनेने बुधवारी (ता. ३१) धडक दिली. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत उड्या टाकून कारखान्याचे गाळप बंद पाडले..राज्यातील ज्या कारखान्यांनी पहिली उचल ३००० रुपयांच्या पुढे नेलेला नाही, त्या कारखान्यांविरुद्ध शेतकरी संघटनेने रणशिंग फुकले आहे. येडेश्वरी कारखान्यानेही अपेक्षित दर न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले. कारखाना बंद पाडल्यानंतर व्यवस्थापन आणि आंदोलक यांच्यात चर्चा झाली. .Sugarcane Price Protest: ऊसदरासाठी ‘संघर्ष समिती’च्या ठिय्या आंदोलनास सुरुवात.अखेर उर्वरित रकमेसंदर्भात ९ ते १२ जानेवारी दरम्यान खासदार सोनवणे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले..Sugarcane Price Protest: ऊस दरवाढीसाठी नांदेडात चक्का जाम आंदोलनाचा इशारा.या वेळी श्री. गायकवाड म्हणाले, की ठरल्याप्रमाणे १२ जानेवारीच्या आत उर्वरित २०० रुपये आणि अंतिम दर ३५०० रुपये देण्याचे आश्वासन न मिळाल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा कारखाना बंद केला जाईल. .या आंदोलनात समाधान शिंदे, रणजित शिंदे, अशोक कारकर, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष किरडे, विजय शिंदे, आकाश नवले, हनुमंत शिंदे, नागेश शिंदे, श्रीधर शिंदे शेतकरी सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.