Rural Development : विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची

Gram Panchayat : प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली, तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २३) केली.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Solapur News : गावच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावत असते. शासनाच्या विविध योजनांच्या निधीचा योग्य वापर करून गावाचा विकास करावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली, तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २३) केली.

सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे ‘आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार’, अमृत महाआवास अभियान पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्याधिकारी ईधाधिन शेळकंदे उपस्थित होते.

Rural Development
Rural Development : करूयात, आरोग्यदायी गाव

पालकमंत्री पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारे व्हावेत, असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून गावाच्या विकासासाठी नियोजन करावे. प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Rural Development
Rural Development : शिक्षण, सामाजिक विकासात ग्रामपंचायतीचे सहकार्य

तसेच जून २०२४ सालापासून राज्यातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. विविध अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असून, विद्यार्थिनींनी या शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

आमदार आवताडे म्हणाले, की पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी‌ आणखी जोमाने काम करून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचेही भाषण झाले.

वडाचीवाडीसह दहा ग्रामपंचायतींचा सन्मान

जिल्हास्तरावरील मुख्य पुरस्कार माढा तालुक्यातील वडाचीवाडी आऊ या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना या वेळी प्रदान करण्यात आला. तर तालुकास्तरावरील अन्य पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीमध्ये- अक्कलकोट- वागदरी, बार्शी- अंबाबाईचीवाडी, करमाळा- खडकी, माढा -वडाचीवाडी आऊ, माळशिरस- पुरंदावडे, मंगळवेढा- बालाजीनगर (लमान तांडा), मोहोळ -आष्टी, उत्तर सोलापूर- कौठाळी, पंढरपूर- तिसंगी, सांगोला -वाकी शिवणे, दक्षिण सोलापूर- दिंडूर या गावाच्या सरपंच व सदस्यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श ग्रामसेवकांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com