Dharashiv News: पूरग्रस्त भागातील २१ गरजू महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी शेळ्यांचे वाटप करण्यात आले. पाथरूड (ता. भूम) येथे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाने शाश्वत विकास न्यासच्या माध्यमातून सोमवारी (ता. २९) हा शेळी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला..यात देऊळगाव, कात्राबाद, खासापूरी, ढगपिंपरी, रुई, परंडा, वालवड येथील २१ गरजू महिलांना स्वावलंबनांसाठी साधन उपलब्ध करून देण्यात आले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले..Crop Loan Distribution: अमरावतीत रब्बी हंगामात बारा टक्के पीककर्जाचे वितरण.पूरस्थितीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी हानी झाली. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, रुद्र सामाजिक संस्था, आधार संस्थेच्या (परंडा) वतीने एकल महिलांना रोजगारासाठी शेळ्यावाटप कार्यक्रम पाथरुड येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता..Seed Distribution: पद्माळे येथील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे बियाणे वाटप.या वेळी जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचे राज्य समन्वयक इब्राहिम खान, ईला कांबळी, सुरेखा जगदाळे, बाबा पवार, युवराज गटकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांची निवड आणि स्थानिक आयोजनात रुद्रा संस्था (अंबी), आधार सामाजिक संस्था आणि एकल महिला संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे समन्वयक युवराज गटकळ यांनी गेली तीन महिने सातत्याने पाठपुरावा करून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे यशस्वी केली. या वेळी ईला कांबळी यांनी मुलांचे शिक्षण, स्कॉलरशिप आणि रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले..सुरेखा जगदाळे यांनी महिला बचतगट, सामूहिक व्यवसाय आणि बाजारपेठ या मार्गदर्शन केले. युवराज गटकळ यांनी महिलांना संघटित होऊन आर्थिक व सामाजिक मुद्द्यांवर काम करण्याचा विश्वास दिला. या वेळी इब्राहिम खान यांचेही भाषण झाले. बालसंगोपन, एकल महिला पेन्शन आणि शासनाच्या विविध योजनांवर चर्चा करण्यात आली..कार्यक्रमासाठी बाबा पवार, नितीन बोराडे, प्रशांत तिकटे, बापू टेकाळे यांनी पुढाकार घेतला. या वेळी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.त्यानुसार महामंडळाने बारामती विमानतळ १९ ऑगस्ट, धाराशिव विमानतळ २० ऑगस्ट, २०२६ रोजी औपचारिकरीत्या हस्तांतरित करण्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.