Drought Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढणार

Drought Update : मागील मोसमात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणांची पाणीपातळी खालावली आहे. वाढती उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Satara News : मागील मोसमात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणांची पाणीपातळी खालावली आहे. वाढती उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील चार तालुक्यांना बसणारे दुष्काळाचे चटके येत्या महिनाभरात जिल्ह्यातील उर्वरित भागाला बसणार आहेत.

मागील मोसमात पावसाने दडी मारल्याने धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठा दर वर्षीहून कमी झाला आहे. पावसाच्या कमी प्रमाणामुळे पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचीही अडचण भेडसावत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई सुरू असून, आठवड्यातून एकदा नळाला पाणी सोडले जात आहे.

अनेक विहिरी, बोअरवेल आटल्या असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यातील परिस्थिती खूप भयावह असणार आहे. मार्चमध्ये चार तालुक्यांमधील दुष्काळाची दाहकता हळूहळू जिल्ह्यातील उर्वरित भागात जाणवणार आहे.

सत्तर हजार पशुधन टॅंकरच्या पाण्यावर

जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भूजल पातळीत घट होत आहे. या परिस्थितीचा पशुधनांनाही फटका बसला असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत ७० हजार ८६५ पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे.

दहा दिवसांतून नळाला पाणी

माण, खटाव तालुक्यांत दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक गावांमध्ये आठ ते दहा दिवसांतून नळाला पाणी येत आहे. अन्य तालुक्यातही साधारणतः अशीच परिस्थिती आहे. माण, खटावनंतर फलटण आणि कोरेगाव तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. विशेषत: कोरेगावच्या उत्तर भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे मात्र, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT