निकीता गोर्डे, समीक्षा अहिरेIndian Agriculture: शेतीमध्ये अनियंत्रित पद्धतीने प्लॅस्टिकचा वाढता वापर धोकादायक ठरत आहे. प्लॅस्टिक आच्छादन, लॅटरल, बियाणे आणि खतांचे प्लॅस्टिक पॅकेजिंग, तसेच कृषी उपकरणांतील प्लॅस्टिक घटकांमुळे मातीमध्ये प्रदूषण वाढत आहे. याचा थेट परिणाम माती आणि परिसंस्थेच्या आरोग्यावर झाला आहे. .माती ही जिवंत प्रणाली आहे. यामध्ये सूक्ष्मजीव, गांडूळ, बुरशी आणि सेंद्रिय द्रव्यांचे परस्परसंबंध पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. मातीची सुपीकता आणि आरोग्य टिकवणे हे केवळ अधिक उत्पादनक्षम शेतीसोबत पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीत उत्पादकता वाढवण्यासाठी खत, कीटकनाशके, सिंचन साधने, आच्छादन आणि यंत्रसामग्री इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो..आधुनिक शेती पद्धतींमुळे उत्पादनात वाढ झाली असली तरी, अशा संसाधनांचा अत्याधिक आणि अयोग्य वापरामुळे मातीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विशेषतः, शेतीत प्लॅस्टिकचा वाढता वापर धोकादायक ठरत आहे. प्लॅस्टिक आच्छादन, ठिबक सिंचन लॅटरल, बियाणे आणि खतांचे प्लॅस्टिक पॅकेजिंग, तसेच कृषी उपकरणांतील प्लॅस्टिक घटकांमुळे मातीमध्ये प्रदूषण वाढत आहे..प्लॅस्टिक हे हलके, टिकाऊ आणि स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत आहे. २०२४-२५ मध्ये जगभरात सुमारे ४१३ दशलक्ष मेट्रिक टन प्लॅस्टिकचे उत्पादन झाले. १९५० पासून आतापर्यंत जगात ८.३ अब्ज टनांहून अधिक प्लॅस्टिक तयार झाले. त्यातील फक्त ९ ते १० टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर झाला. भारताचा जागतिक प्लॅस्टिक वापरात सुमारे ६ टक्के वाटा आहे. देशात दरवर्षी अंदाजे १०.२ दशलक्ष टनांहून अधिक प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. .Soil Management: माती व्यवस्थापन दुर्लक्षितच!.महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र आकडेवारी मर्यादित असली तरी शहरी भागांतील कचरा व्यवस्थापन अहवालांनुसार प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, ज्याचा थेट परिणाम माती आणि परिसंस्थेच्या आरोग्यावर होत आहे. या कचऱ्याचा मोठा हिस्सा साठवण्याची जागा (लँडफिल), नद्या किंवा समुद्रात साचतो. परिणामी, प्लॅस्टिकचे अवशेष नैसर्गिक वातावरणात दीर्घकाळ टिकून राहतात..मोठ्या आकारातील प्लॅस्टिक वस्तू कालांतराने सूक्ष्म कणांमध्ये विभागल्या जातात आणि मायक्रोप्लॅस्टिक तयार होते. हे मायक्रोप्लॅस्टिक माती, पाणी आणि हवेत पसरून सूक्ष्मजीव, गांडूळ आणि वनस्पतींच्या जीवनचक्रावर प्रतिकूल परिणाम करतात. त्यामुळे प्लॅस्टिक व मायक्रोप्लॅस्टिक प्रदूषण आज एक जागतिक पर्यावरणीय संकट बनले आहे, जे मातीच्या आरोग्यापासून अन्नसाखळीपर्यंत प्रत्येक घटकांवर परिणाम करत आहे..मायक्रोप्लॅस्टिक म्हणजे काय?पाच मिलिमीटरपेक्षा लहान आकाराचा कोणताही प्लॅस्टिक तुकडा म्हणजे मायक्रोप्लॅस्टिक. हे सात प्रमुख पॉलिमर गटांपासून बनलेले असतात. यामध्ये पॉलीप्रॉपिलीन (PP), पॉलीअमाईड (PA), पॉलीइथिलीन (PE), पॉलीस्टायरीन (PS), पॉलीयुरेथेन (PUR), पॉलीइथिलीन टेरेफ्थालेट (PET) आणि पॉलीव्हिनाइल क्लोराइड (PVC) यांचा समावेश होतो..सुरुवातीला मायक्रोप्लॅस्टिक समुद्र आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळून आले, परंतु आता मातीमध्ये ते मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.जागतिक पातळीवर सुमारे ८० टक्के प्लॅस्टिक कचरा लँडफिलमध्ये टाकतात. त्यामुळे माती हा मायक्रोप्लॅस्टिकचा मोठा साठा बनला आहे. संशोधनानुसार, अंदाजे ९० टक्के प्लॅस्टिक शेवटी मातीमध्ये जाते.मातीमध्ये मिसळलेले हे कण दशकानुदशके टिकून राहतात. त्यामुळे मातीचे आरोग्य, पोषकचक्र व सूक्ष्मजीव समुदायावर परिणाम घडवू शकतात..मायक्रोप्लॅस्टिकचे प्रकार आणि स्रोत प्राथमिक मायक्रोप्लॅस्टिक :ज्यांचा आकार सुरुवातीपासूनच सूक्ष्म असतो. उदा. सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाणारे मायक्रोबीड्स, धुण्याच्या वेळी कपड्यांमधून निघणारे मायक्रोफायबर्स.दुय्यम मायक्रोप्लॅस्टिक ः मोठ्या प्लॅस्टिक वस्तू जसे पिशव्या, बाटल्या, टाक्या, प्लॅस्टिक आच्छादन यांचे विघटन होऊन दुय्यम मायक्रोप्लॅस्टिक तयार होतात. यामध्ये खालील प्रक्रिया समाविष्ट आहेत.सजीवांद्वारे विघटन: सूक्ष्मजीव प्लॅस्टिक हळूहळू विघटित करतात.सूर्यकिरणांद्वारे विघटन: सूर्याच्या यूव्ही किरणांमुळे प्लॅस्टिकचे विघटन होते.उष्णतेमुळे विघटन: गरम वातावरणात प्लॅस्टिक हळूहळू विघटित होते.भौतिक घटक : वारा, वाळू आणि जीवजंतूंच्या हालचालींमुळे प्लॅस्टिकचे तुकडे होतात..Save Soil: माती आणि मानवी सभ्यता.मातीमध्ये मायक्रोप्लॅस्टिक पोहोचण्याचे स्रोतप्लॅस्टिक आच्छादनाचा वापर शेती, पाणी संवर्धन आणि तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. कालांतराने या आच्छादनाचे सूक्ष्मकण मातीमध्ये मिसळतात.सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांमधून मिळणाऱ्या गाळामध्ये अनेक प्रकारची प्रदूषके एकत्रित असतात. यामध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे प्रमाण जास्त असते, कारण प्लॅस्टिकचे सूक्ष्म तुकडे सांडपाण्यातून गाळात साठतात. हा गाळ जर खत म्हणून थेट शेतात टाकला गेला, तर मातीमध्ये मायक्रोप्लॅस्टिक मिसळते.शेणखत, कंपोस्टमध्ये मिसळलेले प्लॅस्टिक घरगुती कचऱ्यापासून तयार होणाऱ्या कंपोस्टमध्ये, तसेच जनावरांच्या खाद्यामध्ये असणाऱ्या प्लॅस्टिकचे अंश शेणखतातून मातीमध्ये जातात..वाहनांच्या टायरच्या घर्षणातून मायक्रोप्लॅस्टिकचे सूक्ष्मकण तयार होतात. हे कण हवा आणि पावसाद्वारे शेतजमिनीमध्ये पोहोचतात.सिंथेटिक कपडे धुतल्यावर त्यातून निघणारे सूक्ष्म तंतू सांडपाण्यात मिसळतात. हे सांडपाणी सिंचनासाठी वापरले गेले की हे तंतू मातीमध्ये मिसळतात.मोकळ्या जागेत किंवा शेतशिवारात टाकलेला प्लॅस्टिक कचरा उष्णता व हवामानामुळे हळूहळू विघटीत होतो. आणि मायक्रोप्लॅस्टिक स्वरूपात मातीमध्ये जमा होतो..इतर स्रोतकृषी अवजारांवरील प्लॅस्टिक आवरण.हरितगृहांमध्ये वापरलेले पॉलीथीनरस्त्यांवरील प्लॅस्टिक रंगाचे कणऔद्योगिक सांडपाणीखत आणि बियाण्यावरील प्लॅस्टिक कोटिंगसिंचनासाठी प्लॅस्टिक ट्यूब वापर..मायक्रोप्लॅस्टिकचे नियंत्रणमातीतील मायक्रोप्लास्टिकच्या प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी जैवविघटनशील प्लॅस्टिकचा वापर वाढवणे महत्त्वाचे आहे, जे नैसर्गिकरीत्या मातीमध्ये विघटित होते.प्लॅस्टिक कचऱ्याचा योग्य पुनर्वापर करावा.शेतीत प्लॅस्टिक आच्छादनाऐवजी सेंद्रिय आच्छादन वापरल्यास मायक्रोप्लॅस्टिकच्या प्रदूषणाचा धोका कमी होण्यास मदत होते.सांडपाणी प्रक्रियेत सुधारणा करून ते शुद्ध स्वरूपात शेतीसाठी वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून मातीमध्ये मायक्रोप्लॅस्टिकचे अतिरिक्त प्रदूषण होणार नाही..बायोरिमेडिएशनमातीतील मायक्रोप्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी बायोरिमेडिएशन पद्धत वापरता येते. यामध्ये सूक्ष्मजीव मायक्रोप्लॅस्टिकचे तुकडे विघटित करून मातीसाठी हानीकारकरहित घटकांमध्ये रूपांतरित करतात..प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणभारत सरकारने प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी २०२४ मध्ये विविध धोरणात्मक पावले उचलली आहेत. त्यामध्ये ‘सिंगल यूज प्लॅस्टिक (नियमन) कायदा’ लागू करून २०२५ पर्यंत सिंगल यूज प्लॅस्टिक पूर्णपणे बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या कायद्यानुसार १ जुलै २०२५ पासून सर्व प्लॅस्टिक पिशव्या आणि मल्टीलेयर्ड पॅकेजिंगवर बारकोड किंवा क्यूआर कोड असणे अनिवार्य केले आहे, ज्यामुळे प्रत्येक पॅक ट्रेस करण्यायोग्य होईल..याशिवाय, ‘प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन (दुरुस्ती) नियम २०२४’ लागू करून विस्तारित उत्पादक जबाबदारी (EPR) धोरणाचा समावेश केला आहे. यामुळे उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या संपूर्ण जीवनचक्रात प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक झाले आहे, ज्यामुळे पुनर्वापर, पुनर्नवीनीकरण आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढेल.भारतात प्लॅस्टिक प्रदूषण कमी होण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्लॅस्टिक वापरावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करणे आणि कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे आवश्यक आहे..मायक्रोप्लॅस्टिकचे परिणाम मातीवर परिणाममातीमध्ये मिसळलेले मायक्रोप्लॅस्टिक भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये बदल घडवतात. यामुळे मातीची सुपीकता कमी होते जे परिणामी शेतीसाठी हानिकारक आहे.मिसळलेले मायक्रोप्लॅस्टिक मातीच्या सच्छिद्रतेवर थेट परिणाम करतात. मातीतील नैसर्गिक सच्छिद्रतेचे प्रमाण असमान होते. ज्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि हवेचे प्रमाण प्रभावित होते. परिणामी, काही ठिकाणी माती जास्त घट्ट होऊन मुळे खोल जाऊ शकत नाहीत, तर काही ठिकाणी पाणी साचून मुळांवर दुष्परिणाम होतो. या बदलामुळे मातीची सुपीकता कमी होते आणि रोपांच्या वाढीस हानी पोहोचते..मातीतील सामू बदलतो, ज्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर पोषक तत्त्वांची उपलब्धता कमी होते. मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असंतुलित होते, परिणामी सूक्ष्मजिवांची क्रियाशीलता कमी होते. मातीची सुपीकता प्रभावित होते.अतिरिक्त मायक्रोप्लॅस्टिकमुळे मातीतील कणांची नैसर्गिक संरचना बदलते, ज्यामुळे माती घट्ट किंवा जड होऊन मातीची घनता वाढते. परिणामी, मुळांची कार्यक्षमता कमी होते. पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे पिकांची वाढ खुंटते.मायक्रोप्लॅस्टिक मातीतील जड धातू, कीटकनाशके आणि इतर रसायने शोषून घेतात, ज्यामुळे मातीतील प्रदूषण वाढते. या प्रदूषणामुळे मातीच्या पर्यावरणावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतो..सूक्ष्मजीवांवर परिणामजैवविविधता कमी होते, ज्यामुळे मातीचे आरोग्य ढासळते.एन्झाईम क्रियाशीलतेत घट: मायक्रोप्लॅस्टिक मातीतील महत्त्वाचे एन्झाइम्स जसे की युरेस, ग्लुकोसिडेस, डीहायड्रोजनेझ इत्यादींची क्रियाशीलता कमी करते.प्रजनन क्षमता कमी होणे: सूक्ष्मजीवांचे प्रजनन प्रभावित होते, परिणामी त्यांच्या संख्येत घट होते.मातीतील सूक्ष्मजीवांच्या जीवनावर गंभीर परिणाम करतात. उदाहरणार्थ जास्त प्रमाणातील मायक्रोप्लॅस्टिकमुळे गांडुळांची पचनसंस्था प्रभावित होऊन त्यांचे प्रमाण कमी होते.अन्नद्रव्यांची कमतरता: मातीतील सूक्ष्मजीव पोषक अन्नद्रव्यांच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु जास्त प्रमाणातील मायक्रोप्लॅस्टिक मातीमध्ये मिसळल्यास सूक्ष्मजिवांची कार्यक्षमता प्रभावित होते, ज्यामुळे मातीतील उपलब्ध पोषक तत्त्वांची मात्रा कमी होते..पीक उत्पादनावर परिणाममातीतील मायक्रोप्लॅस्टिकमुळे पिकांवर थेट नकारात्मक परिणाम दिसून येतो. मातीची रचना बदलते, ज्यामुळे पिकांच्या मुळांना पाणी आणि पोषणद्रव्ये योग्य प्रकारे मिळत नाहीत. बीजांच्या अंकुरणाच्या प्रक्रियेतही अडथळे निर्माण होतात, कारण मायक्रोप्लॅस्टिक बीजांच्या टोकांना अडकतो, परिणामी अंकुरण कमी होते.उदाहरणार्थ, गव्हामध्ये खताचा प्रभाव नीट दिसत नाही आणि पोषक तत्त्वांचेशोषण कमी होते. लेट्यूस किंवा इतर पिकांमध्ये मायक्रोप्लॅस्टिकमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया आणि अँटीऑक्सिडंट प्रणालीवर नकारात्मक परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे पिकांची वाढ खुंटते, उत्पादनात घट होते.निकीता गोर्डे ८७८८३४९१८७समीक्षा अहिरे ९३०९८६४२७५(आचार्य पदवी विद्यार्थिनी, मृदा विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.