Crop Management: शेतकरी नियोजन । पीक : हळदशेतकरी : सुमीत अरुण आपटेगाव : कसबे डिग्रज, ता. मिरज, सांगली.एकूण शेती : १३ एकरहळद क्षेत्र : २ एकर (सेलम वाण).कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील सुमीत अरुण आपटे मागील चार वर्षांपासून हळद लागवड करत आहेत. पीक फेरपालटीवर भर देत उत्पादन वाढीसाठी जमिनीच्या आरोग्यावरही तितकेच लक्ष केंद्रित केले आहे. हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांच्याकडून हळद पिकाचे मार्गदर्शन घेऊन तंत्रशुद्ध लागवडीस त्यांनी सुरुवात केली. बेणे निवड, सुधारित लागवड पद्धती, अन्नद्रव्ये आणि पीक व्यवस्थापन आदी बाबींचा बारकाईने अभ्यास सुरु केला. रासायनिक खतांऐवजी जैविक आणि सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला..Turmeric Farming: हळदीवरील खोडकिडा,पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण.हळद लागवडीसाठी निवडलेल्या शेतातील ऊस काढणी पूर्ण झाल्यानंतर त्याची शेतातच कुट्टी केली जाते. तसेच विविध पिकांचे अवशेष रोटरच्या साह्याने मातीआड करण्यावर भर दिला जातो. लागवडीसाठी चार फुटी सरीचा पर्याय निवडला आहे. लागवडीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत दोन ट्रॉली आणि मासळी खत मिसळले जाते. दरवर्षी साधारपणे १५ मेच्या दरम्यान हळद लागवडीचे नियोजन असते. लागवडीसाठी सेलम जातीचे बेणे वापरले जाते. घरचे बेणे वापरण्यावर भर दिला जातो. त्यासाठी निरोगी, सुप्तावस्था पूर्ण झालेले मागील वर्षीचे मातृकंद वापरले जातात. लागवडीपूर्वी जैविक आणि रासायनिक बेणेप्रक्रिया करण्यावर भर दिला जातो. लागवडीसाठी एकरी १२ क्विंटल बेणे वापरले जाते. यावर्षी देखील घरचे बेणे वापरले आहे..खत व्यवस्थापनदरवर्षी माती परिक्षण केले जाते. त्यानुसार खतांचा संतुलित वापर करण्यावर भर दिला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने जिवाणू खतांच्या वापरावर भर दिला जातो. लागवड केल्यानंतर एक महिने निमपेंड, करंजीपेंड, सरकी आणि सूर्यफूल पेंड यांचे मिश्रण करून वापर केला जातो..यंदाचे नियोजनअति पावसामुळे पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. उंची खुंटली असल्या कारणामुळे पिकात सध्या मर रोग, कंदकुज प्रादुर्भाव तसेच कंदाची योग्य वाढ न होणे अशा समस्या दिसत आहेत. पीक सध्या साडेपाच महिन्यांचे झाले आहे. परंतु सततच्या पावसामुळे पिकात नियोजित वेळेत योग्य पद्धतीने भरणी करणे शक्य झाले नाही. शेतात वापरलेल्या पेंडी (सरकी, नीम, करंज पेंड) भरणी न करता आल्यामुळे मातीआड झाल्या नाहीत. त्यामुळे त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. येत्या पंधरा दिवसात पाऊस थांबल्यानंतर रासायनिक फवारणी व आळवणी घेण्याचे नियोजन आहे..Turmeric Farming : हळद पिकातील प्रमुख किडींचे नियंत्रण .हवामानातील बदलामुळे कंद भरणीचा जो काळ आहे तो कमी होत जात असल्यामुळे कंद योग्य रीतीने भरले जात नाही. ठिबकच्या माध्यमातून सिंचन करण्यावर भर देण्यात आला आहे. ठिबकद्वारे खत व्यवस्थापन करण्यात येते. आगामी काळात कंद पोसण्यासाठी पोषक हवामान स्थिती राहील. येत्या काळात भरणी करणार आहे..पावसाचे अतिरिक्त पाणी त्वरित पिकाबाहेर जाण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला. जेणेकरून कंदकूज आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव रोखला जाईल.योग्य प्रमाणात फुटवे तयार होण्यासाठी शिफारशीत घटकांच्या मात्रा दिल्या आहेत. यामुळे अपेक्षित फुटवे मिळण्यास मदत झाली. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जीवामृत, वेस्ट डी कंम्पोजर इत्यादींच्या वापरावर अधिक भर देण्यात आला..आगामी नियोजनसध्या हळद पीक कंद पोसाण्याच्या अवस्थेत आहे. आगामी काळात कीड-रोग आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर दिला जाईल.हळकुंडांची जाडी व लांबी वाढण्यासाठी सेंद्रिय खत, स्लरी, नीम, करंजी, सरकी पेंडीच्या वापरावर भर देण्यात येईल. तसेच एनपीके उपलब्ध करणाऱ्या जिवाणू खतांच्या वापरावर भर दिला जाईल.पीक संरक्षणासाठी जैविक निविष्ठांच्या वापरावर अधिक भर देत आहे.- सुमीत आपटे ९९२२४३९९९८(शब्दांकन : अभिजित डाके).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.