Drought Compensation : खरिपातील दुष्काळाच्या नुकसानीपोटी सांगोल्याला १५७ कोटीचा निधी

Crop Damage Compensation : राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२३ मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
Crop Compensation
Crop CompensationAgrowon

Solapur News : खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.

राज्यातील ४० तालुक्यांमध्ये खरीप हंगाम २०२३ मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.यामध्ये सांगोला तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. सांगोला तालुक्यात २ हेक्टर मर्यादेत ४४ हजार ०६७ हेक्टर जिरायती, २१ हजार ५४३ हेक्टर बागायत, १४ हजार १९९ हेक्टर बहुवार्षिक पिके असे ७९ हजार ८१० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते.

Crop Compensation
Drought Condition : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

२ ते ३ हेक्टर मर्यादेत २४ हजार ०६५ हेक्टर जिरायती, १० हजार ३६१ हेक्टर बागायत, ५ हजार ७६७ हेक्टर बहुवार्षिकपिके असे ४० हजार २९३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते.

२ हेक्टर मर्यादेत (२२४५- २४३४) ३ हजार ७४५ हेक्टर जिरायत, ३ हजार ६६२ हेक्टर बागायत, ३ हजार १९४ हेक्टर बहुवार्षिकपिके असे १० हजार ६०३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते.

Crop Compensation
Kolhapur Drought : कोल्हापूरच्या अनेक तालुक्यात दुष्काळाच्या झळा गडध, शेकडो हेक्टर ऊस पीक धोक्यात

२ ते ३ हेक्टर मर्यादेत (२२४५-२१६७) २ हजार ९४५ हेक्टर जिरायत, १ हजार ७६१ हेक्टर बागायत, १ हजार २९७ हेक्टर बहुवार्षिकपिके असे ५ हजार १०४ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते.

या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com