Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ऊसदराची दुसरी बैठकही निर्णयाविना

Raju Shetti : आम्ही दोन पाऊले मागे येण्यास तयार आहोत, पण कारखानदार म्हणतील तो दर आम्ही मान्य करणार नाही. या बाबत कारखान्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा.

Raj Chougule

Kolhapur News : आम्ही दोन पाऊले मागे येण्यास तयार आहोत, पण कारखानदार म्हणतील तो दर आम्ही मान्य करणार नाही. या बाबत कारखान्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा. अन्यथा, भविष्यात होणाऱ्या घटनांना साखर कारखानदार जबाबदार राहतील, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना इशारा दिला.

गेल्‍या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये द्यावेत या मागणीसाठी गुरुवारी (ता. २) कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेली दुसरी बैठकही कोणत्याही निर्णयाविना झाली. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी ही बैठक बोलवली होती. बैठकीत साखर कारखानदारांचे कार्यकारी संचालक व अन्य अधिकारी उपस्‍थित होते. या वेळी कारखानदार प्रतिनिधींनी मागील दर देण्याबाबतच्या अडचणी मांडल्या. पण श्री. शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दराबाबत ठाम राहिले.

श्री. शेट्टी म्हणाले, की जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचा मला चर्चेसाठी फोन आला होता. या वेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी काहीतरी मार्ग काढा असे म्हणाले. यामुळे माझी एक पाऊल पुढे येऊन तोडगा काढण्याची तयारी आहे. परंतु कारखानदारांनी चिरीमिरी दिल्यासारखा दर समोर ठेवला तर मी तोडगा काढण्यास मान्य करणार नाही. आमची मागणी ४०० रुपये दुसरा हप्ता द्या अशी आहे.

हा आग्रह सोडतो, तुम्ही काय मार्ग काढणार ते सांगा. मलाही संघर्ष नको आहे. या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष आले नाहीत. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अध्यक्षांशी चर्चा करून साखर कारखानदारांनी योग्य तो तोडगा काढावा. जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करायचे नाहीत कारखाना रेटून चालू करायचा आणि आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा मला ऐकायला मिळत आहे. असा प्रयत्न झाल्यास आमची संघटनाही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहे.

राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून राज्यातील हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले, पण ‘स्वाभिमानी’ने तत्पूर्वीच ज्या ठिकाणी तोडी चालू आहेत त्या रोखणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडणे, ती पेटवणे असे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनानेच यात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सध्यातरी या तोडग्यावर निर्णय झाला नाही. परंतु पुढच्या काही दिवसांत ही पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेऊ, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ऊस तोडणी सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. शिरोळ हातकणंगले तालुक्‍यात, तर एखाद दुसऱ्या कारखान्यानेच ऊसतोडणी सुरू होती. काही ठिकाणी साखर अडवणे, ट्रॅक्‍टर अडवणे आदी प्रकार सुरू असल्याने कारखान्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा दर स्थिर; गाजर- भेंडीचे दर टिकून, आले दरात सुधारणा तर उडदाचे दर कमी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

Mulberry Cultivation : सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र

Dudhana Dam Water Level : निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT