DY Patil Agri University: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. गुप्ता
Vice Chancellor: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. ए. के. गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात डॉ. गुप्ता यांनी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली.