Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी मंजूर ५२३ कोटी ९८ लाख रुपयांपैकी आतापर्यंत १९० कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. बाधित सहा लाख ३९ हजार ६१० शेतकऱ्यांपैकी चार लाख १४ हजार ९३३ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी दोन लाख २९ हजार ३७७ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिली..अतिवृष्टीनंतर प्राप्त झालेले अनुदान, त्याचे आतापर्यंत करण्यात आलेले वितरण याविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. ३०) आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पुजार यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनांक घोष, पोलिस अधीक्षक रिती खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची उपस्थिती होती. .Farmer Relief : ई-केवायसी नसल्याने ‘डीबीटी’पासून लाभार्थी वंचित.जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, की जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नऊ व्यक्तींचा मृत्यू झाला. मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांप्रमाणे ३६ लाख वितरित करण्यात आले आहेत. दुधाळ, ओढकाम करणारी ३१२ जनावरे दगावली असून, त्यापैकी २०० पशुमालकांना मदत देण्यात आली आहे..जिल्ह्यातील सात हजार ६२८ घरांची अंशतः पडझड झाली असून, यापैकी सहा हजार ४०० घरांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जूनपासून आतापर्यंत पाच शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जुलै व ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे दोन लाख ३४ हजार ९५५ शेतकरी बाधित झाले. यापैकी एक लाख ८१ हजार ६७० शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. .Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच .तर एक लाख ४१ हजार १८२ शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. प्राप्त १८९ कोटींपैकी ११७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे चार लाख चार हजार ६५५ शेतकरी बाधित झाले. यापैकी दोन लाख ३३ हजार २६३ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, ८८ हजार १५५ शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे..ॲग्रिस्टॅकची (फॉर्मर आयडी) नोंदणी नसलेले व ई-केवायसीअभावी काही शेतकऱ्यांना अनुदान वितरणास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकची नोंदणी करावी. जिल्ह्यातील तीन लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकची नोंदणी केली असून, राज्यात जिल्हा द्वितीय क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.