Sugarcane FRP : थकित ‘एफआरपी’ द्या; भाजपची मागणी

Sugarcane FRP Issue : ‘एफआरपी’ दिल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर यांनी साखर सहसंचालकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPagrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील आमडापूर (ता. परभणी) येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सकडील थकित ‘एफआरपी’ दिल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस (ग्रामीण) विलास बाबर यांनी नांदेड येथील विभागीय साखर सहसंचालकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sugarcane FRP
Bogus Seeds : वाशीम जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवस राहणार बंद

बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे, की इथेनॉलसाठी साखर वळविलेल्या साखर कारखान्यांनी उतारा प्रमाणीकरण केलेले नाही. २०२३-२४ च्या हंगामातील दर निश्‍चित न करता परभणी जिल्ह्यात कारखाने सुरू करण्याची तयारी सुरू आहे. हे थांबवून उसाचा भाव जाहीर करावा.

Sugarcane FRP
Hasan Mushrif Sugar Factory : हसन मुश्रीफांच्या कारखान्याची एकरकमी एफआरपी जाहीर, मागील हफ्त्याबाबत मात्र मौन

२८ मार्च २०२३ रोजी एफआरपीकरिता शेतकरी कारखान्यावर ठिय्या आंदोलनास बसले होते, त्या वेळी कारखान्याचे संचालक संजय धनकवडे व प्रमोद जाधव यांनी ३० एप्रिल २०२३ पर्यंत गाळप झालेल्या सर्व उसाचे प्रतिटन २३०० रुपयेप्रमाणे पैसे देण्याचे व संपूर्ण थकित एफआरपी १० मे २०२३ पर्यंत अदा करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. तरीही थकित एफआरपी अद्याप दिलेली नाही.

उलट वस्तुस्थितीला अनुसरून अथवा प्रामाणिकपणे उतारा प्रमाणीकरण न करता उतारा कमी दाखवून (१०.४२ टक्के), तोडणी व वाहतूक खर्च वाढवून (८०७ रुपये), एफआरपी कमी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. जिल्ह्यातील देवनांद्रा (ता. पाथरी) व कानडखेड (ता. पूर्णा) येथील कारखान्यांनी उसाला दिलेला दर किमान श्री लक्ष्मी नृसिंहने द्यावा, अन्यथा गाळप थांबवू, याची नोंद घ्यावी, असा इशारा विलास बाबर यांनी दिला. या वेळी उद्धव खिल्लारे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com