Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : कृषी पुरस्कार निवडीची राज्यभर प्रक्रिया सुरू

Agriculture Award : राज्याच्या शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना २०२३ मधील विविध कृषी पुरस्कार देण्यासाठी निवडीची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना २०२३ मधील विविध कृषी पुरस्कार देण्यासाठी निवडीची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली आहे.

कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादनात भरीव काम केल्याबद्दल तसेच शेतीमधील उत्पादकता आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात.

वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट किंवा संस्थांना विविध पुरस्कारांसाठी थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव देता येतील, असे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात प्रस्ताव मागवून छानणी व त्यानंतर उच्चस्तरीय समितीकडून अंतिम निवड केली जाणार आहे.

विशेष म्हणजे पुरस्कारांच्या रकमांमध्ये आता भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे मानाच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कारार्थीला तब्बल तीन लाखांपर्यंत रक्कम दिली जाईल. कृषिरत्न पुरस्काराची रक्कम आधी केवळ ७५ हजार रुपये होती.

वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण आणि सेंद्रिय शेतीमधील कृषिभूषण व उद्यानपंडित या पुरस्कारांची आधीची रक्कम ५० हजारांवरून आता दोन लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र व युवा शेतकरी पुरस्काराची रक्कम आता ३० हजारांऐवजी १.२० लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याकरिता पुरस्कार्थींना प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिले जातात. त्यासाठी आधी केवळ ११ हजार रुपये दिले जात होते.

आता ही रक्कम ४४ हजार रुपये करण्यात आली आहे. कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवारत्न पुरस्कार दिला जातो. राज्यातील उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञाला देखील पुरस्कार दिला जातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT