Vijay Jawandhia Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Price Demand: पंतप्रधानांनी वचनाला जागत सोयाबीनला सहा हजार दर द्यावा

Vijay Jawandhia: निवडणुकीत सोयाबीनला 6000 दर देण्याची घोषणा केली होती, मात्र शेतकऱ्यांना अजूनही तो लाभ मिळालेला नाही. शेती अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान मोदींना नागपूर दौऱ्यापूर्वीच वचनपूर्ती करण्याची मागणी केली आहे.

Team Agrowon

Nagpur News: विधानसभा निवडणुकीत सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये प्रति क्‍विंटलचा दर देण्याची घोषणा करण्यात आली होती. या आश्‍वासनाची पूर्तता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावी, अशी मागणी शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली आहे.

श्री. जावंधिया यांच्या पत्रानुसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे. मात्र या वचननाम्याच्या पूर्ततेसाठी ग्राउंड लेव्हलवर मात्र कोणतेच काम होत नसल्याची स्थिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक काळात सोयाबीनचे दर दबावात असल्याने त्याचा फटका बसण्याची शक्‍यता पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन उत्पादकांना गोंजारण्यासाठी प्रति क्‍विंटल सहा हजार रुपयांचा दर दिला जाईल, असे जाहीर केले होते.

मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. बाजारात तर परिस्थिती फार विदारक असून हमीभावही शेतकऱ्यांना मिळत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. ३८०० ते ४००० रुपये प्रति क्‍विंटल दराने सोयाबीनचे व्यवहार होत आहे. या व्यवहारात शेतकऱ्यांना प्रति क्‍विंटल सुमारे १००० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

महाराष्ट्रात सुमारे ५० लाख हेक्‍टरवर सोयाबीन लागवड होते. सरासरी चार क्‍विंटलची उत्पादकता आणि प्रति क्‍विंटल एक हजार कमी दर अपेक्षित धरता सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान सोयाबीन उत्पादकांचे होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता. ३०) नागपूर दौऱ्यावर आहेत. निवडणूक काळात त्यांच्याद्वारे सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली होती. या आश्‍वासनाची पूर्तता त्यांनी नागपूर दौऱ्यापूर्वी करणे अपेक्षित आहे.
विजय जावंधिया, शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT