Soybean Cultivation : सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

Soybean Sowing : जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची निवड करतात. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
Salam Kisan
Salam KisanAgrowon
Published on
Updated on

जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची निवड करतात. सलाम किसान समुहाकडून शेतकऱ्यांसाठी हरभरा लागवड तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.   

जमीनीची मशागत  

जमीन चांगली नांगरून जमिनीची २ ते ३ वेळा वखरणी करावी म्हणजे जमीन भुसभुशीत होईल.सिंगल सुपर फॉस्फेट - १ बॅग (५० किलो)जय संजीवनी – ५ किलोवरिल घटकांची फवारणी करुन पुन्हा एकदा नांगरणी करावी.  (वरील घटकांचे प्रमाण प्रति एकर साठी दिलेले आहे.)

वाण निवड

केडीएस ३४४, पीके ४७२, टीएएमएस ३८, एमएसीएस ११८८, फुले कल्याणी, जेएस ९३०५, केएस १०३, डीएस २२५ किंवा बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही बियाणे तुम्ही निवडू शकता. बियाण्याचे प्रमाणभारी जमिनीसाठी एकरी २२ ते २५ किलो तर हलक्या जमिनीसाठी २५ ते ३० किलो बियाणे लागते. 

बियाणे प्रक्रिया

पेरणीपूर्वी पुढील घटक १ लिटर पाण्यात मिसळून या मिश्रणात हे बियाणे भिजवून रात्रभर सावलीत वाळवावे.  त्यानंतरच पेरणी करावी. ह्युमिक जेल - १०० ग्रॅममठ्ठा-कार्ब ५० - १०० ग्रॅम

खत व्यवस्थापन  

सोयाबीनची लागवड जून व जुलै महिन्यात केली जाते. भारी व काळी माती असल्यास २ ओळींमधील अंतर २ फूट ठेवावे व मध्यम व हलक्या जमिनीत २ ओळींतील अंतर १.५ फूट ठेवावे. तूर हे आंतरपीक म्हणून घ्यायचे असल्यास ६:१ किंवा ८:१ या प्रमाणात लागवड करावी.

खताची पहिली मात्रा पेरणीसोबत द्यावी.२०:२०:००:१३ - १ पिशवी (५० किलो)हाय पॉवर - १० किलोशक्ती सोने - १० किलो(वरील घटकांचे प्रमाण हे प्रति एकरसाठी दिले आहे.)पहिली फवारणीपहिली फवारणी पेरणीनंतर १८ ते २२ दिवसांनी करावी.

खाली दिलेल्या घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंपासाठी आहे.

ह्युमिक जेल - २५ ग्रॅम

चॅलेंजर - ५ मिली

व्हे-ठोक - २० ग्रॅम

पॉवर सेव्हर (स्टिकर) मिसळणे - प्रत्येक फवारणीसाठी १० मिली प्रति पंप अनिवार्य आहे.

गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार पहिली फवारणी पुन्हा करावी.

Salam Kisan
Chana Cultivation : हरभरा लागवड तंत्रज्ञान

तण व्यवस्थापन 

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी खुरपणी करावी.  दुसरी खुरपणी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी करावी. पेरणीनंतर १५ ते २१ दिवसांनीच तणनाशकाची फवारणी करावी.

खताची दुसरी मात्रा

दोन ते तीन फुले दिसल्यास खाली दिलेल्या खताची फवारणी करून नंतर पिकाला पाणी द्यावे.युरिया - २०-३० किलोदुसरी फवारणी खताची दुसरी मात्रा दिल्यानंतर दोन दिवसांनी करावी.वरील खताची मात्रा प्रति एकरसाठी दिली आहे.)

दुसरी फवारणी

दुसरी फवारणी खताची दुसरी मात्रा दिल्यानंतर दोन दिवसांनी करावी.खाली दिलेल्या घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंपासाठी आहे.वरद चमत्कार - ५ मिलीफ्लॉवर मजबूत - २५ मिलीडब्ल्यू-जजमेंट - २० मिलीवी-इमान - २० मिलीपॉवर सेव्हर (स्टिकर) चे मिश्रण - प्रत्येक फवारणीसाठी १० मिली प्रति पंप वापरावे.  

गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार दुसरी फवारणी पुन्हा करावी.

तिसरी फवारणी

तिसरी फवारणी शेंगा तयार करताना करावी. खाली दिलेल्या घटकांचे प्रमाण प्रति १५ लिटर पंप आहे.

एमिनो जेल - २५ ग्रॅम

व्हाई-कॉम्बो - २५ ग्रॅम

व्ही-टोन - २५ मिली

व्हे-प्राइड - १५ ग्रॅम

पॉवर सेव्हर (स्टिकर) मिसळणे - प्रत्येक फवारणीसाठी १० मिली प्रति पंप  वापरावे. गरज भासल्यास पिकाच्या स्थितीनुसार तिसरी फवारणी पुन्हा करावी. 

काढणी  

८० ते ९० टक्के पाने काड्यांसह गळून पडतात आणि शेंगांचा रंग पिवळा ते काळा होतो तेव्हा सोयाबीन पिकाची काढणी करावी. बियाण्यातील ओलावा १४ ते १५ % असेल तेव्हा काढणी करावी. पीक धारदार विळ्याने जमिनीलगत कापून उन्हात चांगले वाळवावे. 

(सलाम किसान हे एक सुपर अॅप आहे. वरील माहिती सलाम किसानकडून पुरवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्यक्ष शेतात तांत्रिक माहितीचा अवलंब करावा.)  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com