Jowar
Jowar  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Rate : ज्वारीसह कडब्याचे दर निम्म्याने घटले

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : चार महिन्यांपूर्वी चार हे पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकणाऱ्या रब्बी ज्वारीच्या दरात मोठी घट झाली आहे. तसेच कडबाही तीन हजार रुपये प्रतिशेकड्यावरून पाचशे ते सातशे रुपये प्रतिशेकड्यापर्यंत खाली आहे. यामुळे सोयाबीनपाठोपाठ ज्वारी, कडब्याच्या दराने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी हरभऱ्‍याचे लागवड क्षेत्र दोन लाख ते अडीच लाख हेक्टरपर्यंत असते. यंदा हरभरा पेरल्यानंतर दोन वेळा मोठ्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी पिकाची मर झाली. यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर रोटर फिरवून रब्बी ज्वारीची पेरणी केली.

दुबार पेरणीत रब्बी ज्वारीचे पेरणी क्षेत्र दीड पट वाढले. वार्षिक सरासरी पेरणीच्या १५५ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. कालांतराने पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा परिणाम ज्वारीच्या पिकाला पोषक वातावरण तयार होऊन ज्वारीचे चांगले उत्पादन आले.

मागील दोन महिन्यांपासून बाजारात नवी रब्बी ज्वारी येताच दरात घसरण झाली. चार महिन्यांपूर्वी चार ते पाच हजार रुपये क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या‍ ज्वारीला दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला. तर रब्बी ज्वारीच्या कडब्याचा दर तीन हजार रुपये प्रतिशेकडा दरावरून पाचशे ते सातशे रुपये प्रतिशेकडापर्यंत खाली घसरला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

ज्वारी साठवून ठेवण्यास प्राधान्य

मागील काही वर्षांपासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होऊ लागल्याने शेतकऱ्‍यांनीही चारा पिकाला प्राधान्य दिले होते. दरम्यान, यंदा सोयाबीन सारखी गत रब्बी ज्वारीची झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दर घटल्याने ज्वारी न विकता घरात साठवून ठेवली आहे.

जनावरांना चारा आणि ज्वारी उपलब्ध व्हावी म्हणून यंदा रब्बी ज्वारी पेरली. पीक चांगले आले. परंतु ज्वारी पाच हजारांवरून दोन हजारांवर आली. कडबाही तीन हजारांवरून पाचशे रुपये शेकड्यावर आला. या भावात ते विकणे परवडणारे नाही.
- गजानन जाधव, शेतकरी, सातेगाव, ता. नायगाव, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT