Jowar Market : ज्वारीच्या दरात निम्म्याने घट

Jowar Rate : जिंतूर बाजार समितीत मंगळवारी (ता.१८) ज्वारीची ९ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान २१०५ ते कमाल २३६१ रुपये तर सरासरी २२०० रुपये मिळाले.
Jowar Market
Jowar MarketAgrowon

Parbhani News : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मागील आठवड्यात ज्वारीला प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २९५२ रुपये दर मिळाले. जिल्ह्यात चार महिन्यापूर्वी ज्वारीचे दर साडेचार हजार रुपयांवर पोहचले होते. परंतु यंदाच्या रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा वाढल्यानंतर ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली. किमान दर दोन हजार रुपयाच्या खाली आले आहेत.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एक-दोन दिवसाआड ज्वारीची आवक होत आहे. मागील आठवड्यात परभणी, जिंतूर, पाथरी, सोनपेठ, ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीची ९ ते ७० क्विंटल आवक राहिली.

Jowar Market
Jowar Market : ज्वारी उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

सरासरी २२०० ते २८१९ रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २०) ज्वारीची ५१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल २७०० रुपये तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.

Jowar Market
Jowar For Birds : शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी एकरभर ज्वारी ठेवली राखीव

जिंतूर बाजार समितीत मंगळवारी (ता.१८) ज्वारीची ९ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान २१०५ ते कमाल २३६१ रुपये तर सरासरी २२०० रुपये मिळाले. पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१८) ज्वारीची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १६०० ते कमाल २६५१ रुपये तर सरासरी २५५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १६) ज्वारीची ३२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २८०० रुपये तर सरासरी २४०० रुपये दर मिळाले.

सोनपेठला १७ क्विंटल आवक

सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १६) ज्वारीची १७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २७६० ते कमाल २९५२ रुपये तर सरासरी २८१९ रुपये दर मिळाले. ताडकळस बाजार समितीत शुक्रवारी (ता. १९) ज्वारीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २१०० ते कमाल २६५१ रुपये तर सरासरी २४०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com