Commercial lpg price And ST Bus Ticket prices Hike Agrowon
ॲग्रो विशेष

Commercial LPG price : सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ; लालपरीचा प्रवासही महागणार?

ST Bus Ticket prices likely to Increase : गेल्या पाच महिन्यापासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर आता एसटी बसच्या तिकीटामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या चार महिन्यापासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होतच आहे. आताही पाचव्या महिन्यात तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात १६.५ रुपयांची वाढ करत व्यावसायिकांना धक्का दिला आहे. दरम्यान राज्यातही एसटी बसच्या तिकीटामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. महामंडळाने १८ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

झारखंड आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे राज्यातील व्यावसायिकांसह प्रवाशांना फटका बसणार आहे.

पाच महिन्यात १७२ रूपयांची वाढ

सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून तब्बल १७२ रूपयांची वाढ झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्याद दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात १६.५ रुपयांची वाढ झाली. यामुळे राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता १ हजार ८१८. ५० रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता १ हजार ७७१ रुपये झाली असून कोलकात्यात सिलेंडरची किंमत १ हजार ९८०.५० रुपये झाली आहे.

घरगुती सिलिंडरच्या दर जैसे थे

दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसून मार्च २०२४ पासून सिलिंडर दर स्थिर आहेत. याआधी मार्च २०२४ मध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात बदल झाला होता. ज्यात दर १०० रूपयांनी कमी करण्यात आले होते. आता दिल्लीत घरगुती सिलिंडर ८०३ रूपये, मुंबईत- ८०२.५०, कोलकात्यात सिलेंडरची किंमत ८२९ रूपये आणि चेन्नईत ८१८. ५० रूपये आहे.

एसटी महामंडळाचा प्रवाशांना 'दे धक्का'

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. पण सरकार येण्याआधीच राज्यातील प्रवाशांना एसटी महामंडळाने धक्का देण्याचे ठरवले आहे. महामंडळाने १८ टक्कांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यामुळे नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामंडळाने वाढती महागाई पाहत हा प्रस्ताव दिली आहे. यात महामंडळाने महत्वाच्या बाबी म्हणून कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन वाढ, सुट्ट्या भागांच्या वाढत्या किंमती, टायर आणि ल्युब्रिकंट यांचे वाढत्या दरांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. तर मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली नसल्याचेही महामंडळाचे म्हणणे आहे.

तर महामंडळाने हा प्रस्ताव निवडणुकीआधी महायुती सरकारकडे दिला होता. पण निवडणुकांमुळे तो राखून ठेवण्यात आला होता. मात्र आता नव्या सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्याने महामंडळाने देखील भाडेवाढ करण्यासाठी हालचाली जलद केल्या आहेत.

जर सरकारने महामंडळाचा प्रस्ताव घेतल्यास १०० रूपये मागे १८ रूपये तिकीट वाढ होण्याची शक्यता आहे. याधी २७ नोव्हेंबर २०२१ मध्ये एसटी महामंडळाने तिकीटदरात वाढ केली होती. पण आता नवे सरकार महामंडळाचा प्रस्ताव घेणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT