LPG Price Today : व्यावसायिकांना दिलासा की थट्टा? गॅस सिलिंडरच्या दरात कपात

LPG Gas Cylinder Price : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय होणार? कशाचे दर वाढणार आणि कशाचे दर कमी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलेंडरच्या दरावरून दिलासा देणारी बातमी आहे. मात्र हा दिलासा किरकोळ आहे.
LPG Price Today
LPG Price Today Agrowon

Pune News : . नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (१ जानेवारी) देशातील व्यावसायिकासाठी दिलासा देणारी बातमी आली. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात फक्त १ रुपये ५० पैशांची घट करण्यात आली आहे.

त्यामुळे गॅस सिलिंडरच्या दरात केलेले हे बदल व्यावसायिकांना दिलासा आहे की त्यांची थट्टा हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे. नवीन वर्षात इंडियन ऑइलने व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरात घट केली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Price Today
LPG : घरगुती गॅस सिलिंडर@११०४ रुपये

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमत

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात बदल झाला आहे. हा बदल फक्त 1.50 रुपयांनी करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईत 1708.50 रुपयांना व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होणार आहे. तर हाच सिलेंडर दिल्लीत 1755.50 रुपये, चेन्नईमध्ये 1924.50 रुपये, कोलकात्यात 1869.00 रुपयांना मिळणार आहे.

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दरात कपात

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत आधिही बदल करण्यात आला आहे. 1 डिसेंबरला व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले होते. त्यानंतर 22 डिसेंबरला देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायीक गॅस सिलिंडर 30.50 रुपयांनी कमी झाला होता.

LPG Price Today
घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागले

घरगुती सिलेंडरच्या किंमती

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत किरकोळ बदल झाला आहे. फक्त 1.50 रुपयांनी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेले नाहीत. याच्या आधी 30 ऑगस्ट 2023 रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात २०० रुपये कपात केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com