Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Monsoon Rain Update : खानदेशात जोरदार सरी कोसळलेल्याच नाहीत. काही भागात पाऊस बरा आहे. तर काही भागात जेमतेम पाऊस आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात जोरदार सरी कोसळलेल्याच नाहीत. काही भागात पाऊस बरा आहे. तर काही भागात जेमतेम पाऊस आहे. अमळनेर, जळगाव, यावल, रावेर, नंदुरबारातील शहादा, नंदुरबार व तळोदा भागांत कमी पाऊस आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण पाऊस ६३२ मिलिमीटर एवढा होत असतो.

धुळ्यात ५३५ मिलिमीटर आणि नंदुरबारात ८६० मिलिमीटर एवढा एकूण पाऊस चार महिन्यात किंवा पावसाळ्यात होत असतो. यात जूनमध्ये अपेक्षित पाऊस जळगाव व धुळे भागात झाल्याचे आकडे आहेत. पण सर्वत्र एकसारखा पाऊस नाही. सर्वदूर पाऊस नसल्याने अडचण आहे. काही महसूल मंडळांत कमी पाऊस असल्याने पेरण्या किती यशस्वी होतील, हा मुद्दा आहे. जळगावात जून महिन्यात १२३ मिलिमीटर एकूण पाऊस होतो.

यात १२४ मिलिमीटर पाऊस या महिन्यात जळगावात झाला. धुळ्यात जूनमध्ये एकूण पाऊस १२१ मिलिमीटर होत असतो. धुळ्यात एकूण पाऊस जूनमध्ये सुमारे १३१ मिलिमीटर एवढा झाला आहे. नंदुरबारात जूनमध्ये १५५ मिलिमीटर पाऊस होत असतो.

Rain Update
Khandesh Rainfall : खानदेशात आत्तापर्यंत कमी पाऊसमान

पण नंदुरबारात जूनमधील पावसात सुमारे २० मिलिमीटरची तूट असून, १३३ मिलिमीटर पाऊस नंदुरबारात जूनमध्ये झाला आहे. नंदुरबारात अनेक महसूल मंडळांत पावसाची तूट आहे. सातपुडा भागात पाऊस बरा आहे. पण नंदुरबार, शहादा, तळोदा भागात पाऊस कमी आहे.

मागील वर्षी २ जुलैपर्यंत चांगला पाऊस खानदेशात झाला होता. ७ जून रोजी अनेक भागांत पावसाने हजेरी लावली होती. यंदा जोरदार पाऊस अपवादानेच काही भागात झाला आहे. मागील वर्षी २ जुलैपर्यंत धुळे व नंदुरबारात प्रत्येकी १६८ मिलिमीटर पाऊस झाला होता. जळगाव जिल्ह्यातही एकूण पाऊस २ जुलैपर्यंत १८१ मिलिमीटरपर्यंत होता. पण यंदा तिन्ही जिल्ह्यांत २ जुलैपर्यंत एकूण पाऊस प्रत्येकी १४५ मिलीमीटरपेक्षा अधिक झालेला नाही.

Rain Update
Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

धुळ्यात एकूण पाऊसमान बरे आहे. पण शिरपूर, धुळे भागात काही महसूल मंडळांत पाऊसमान कमी आहे. पेरण्या शेतकरी करीत आहेत. रोज हलका ते तुरळक पाऊस काही भागात येतो. यामुळे पिकांना बरा आधार आहे. दुबार पेरणीची वेळ अनेक भागात मध्यंतरी होती. ही वेळ टळली, पण चांगला पाऊस झालेला नाही.

दोनच प्रकल्पांबाबत स्थिती बरी

जिल्ह्यासाठी उपयुक्त असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा लाभक्षेत्रात चांगला पाऊस येत असल्याने वाढत आहे. गिरणातील जलसाठा गुरूवारी (ता.३) सकाळी ३७ टक्के एवढा होता. गिरणा धरण नाशिकमधील नांदगावात आहे. पण त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास असून, हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे.

त्याची साठवणक्षमता १८ टीएमसी आहे. तापी नदीवरील भुसावळ (जि.जळगाव) नजीकच्या हतनूर प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे. तापी नदीस प्रवाही पाणी आहे. हतनूरमधून विसर्ग सुरू असल्याने पुढे तापी नदीवरील शेळगाव (ता.जळगाव), धुळ्यातील सुलवाडे (ता.शिरपूर), नंदुरबारातील सागंरखेडा (ता.शहादा) व प्रकाशा (ता.शहादा) या बॅरेजमधूनही विसर्ग सुरू आहे. अन्य भागात मात्र प्रकल्पांतील जलसाठा फारसा वाढत नसल्याची स्थिती आहे. कारण जोरदार पाऊस नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com