Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाची हजेरी नुकसान वाढविणार

Rain Update : खानदेशात सध्या कापूस, उडीद, मूग, केळी, पपई काढणीचा हंगाम सुरू आहे. कलिंगड पीकही आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सध्या कापूस, उडीद, मूग, केळी, पपई काढणीचा हंगाम सुरू आहे. कलिंगड पीकही आहे. परंतु या पिकांना अतिपावसाने फटका बसला आहे. आणखी पाऊस खानदेशात सुरू झाला असून, नुकसान पातळी आणखी वाढेल, अशी स्थिती आहे.

पाऊस नको, निरभ्र वातावरण हवे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे उमलू लागली आहेत. त्यात वेचणीही काही भागात किंवा हलक्या, मध्यम जमिनीच्या क्षेत्रात सुरू झाली आहे. वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. अशात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

एकीकडे प्रमुख नद्या, प्रकल्पांत पाणीच पाणी आहे. दुसरीकडे खरीप हंगामावर अतिवृष्टीचे सावट आहे. खानदेशात अनेक भागांत सततच्या पावसाने पिके हातची गेली आहेत. यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जात आहे.

मागील तीन ते चार दिवस खानदेशात पाऊस अपवाद वगळता नव्हता. शेतीकामे सुरू होती. फवारणी, केळी, पपईची काढणी, तणनियंत्रण व अन्य कामे गती घेत होती. तसेच कापूस वेचणीदेखील अनेक भागात सुरू झाली. परंतु बुधवारी (ता. १८) सकाळी अनेक भागांत पाऊस आला.

पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. अनेक शेतकरी पाऊस थांबल्यास पुढे रब्बीचे नियोजन करण्यात व्यस्त होते. लवकर रब्बी हंगामाला सुरुवात करू, असाही निर्धार शेतकऱ्यांनी केला. परंतु पावसाने शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी फिरविले आहे. बुधवारी जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल व अन्य भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. तर काही भागात तुरळक पाऊस झाला. काळे ढगही जमा झाले. सूर्यदर्शन बुधवारी सकाळी झालेच नाही.

टक्केवारी अपेक्षेपेक्षा अधिक

खानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. जळगावचे एकूण पाऊसमान ६३२ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात ६६२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धुळ्याचे एकूण पाऊसमान ५३५ मिलिमीटर असून, धुळ्यात ६१५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

नंदुरबारचे पाऊसमान ८६० मिलिमीटर आहे. नंदुरबारात ९३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धुळ्यात १५० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. तर जळगाव व धुळ्यातील पावसाची टक्केवारी १०८ पर्यंत आहे. जेवढा पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत खानदेशात व्हायला हवा, तेवढा पाऊस जून ते ऑगस्टअखेर खानदेशात झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT