Crop Damage : अमरावती विभागातील अडीच लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Heavy Rain Update : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अतिवृष्टीचा अमरावती विभागातील ७६७ गावांना फटका बसला असून या भागातील २ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage Issue
Crop Damage IssueAgrowon
Published on
Updated on

Amravati News : यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अतिवृष्टीचा अमरावती विभागातील ७६७ गावांना फटका बसला असून या भागातील २ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, पूर व वीज पडून झालेल्या अपघातांत ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ व अकोला जिल्ह्यास पावसाचा मोठा फटका बसला आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल विभागीय महसूल विभागाने दिला आहे. त्यानुसार अमरावती विभागातील ७६७ गावांना अतिपावसाचा व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. विशेषतः यवतमाळ व अकोला जिल्ह्यास अतिवृष्टीचा अधिक फटका बसला आहे.

Crop Damage Issue
Crop Damage : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात १२,७०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ६२७ व अकोला जिल्ह्यातील ५१ हजार ५६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. सर्वांत कमी नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले असून ५८११ हेक्टरमधील पिके ३३ टक्क्यांहून अधिक बाधित झाली आहेत. बुलडाणा ९९३३ व वाशीम जिल्ह्यातील १० हजार ४१२ हेक्टरला फटका बसला आहे.

पावसाबरोबरच वीज पडून व पुरात वाहून गेल्याने तब्बल ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३८ जणांचा पुरात वाहून गेल्याने तर, दहा जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. उर्वरित सात जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शासनाने यातील ३४ प्रकरणांत मृतकांच्या कुटुंबीयांना मदत दिली आहे. तर, २० प्रकरणांचा चौकशी अहवाल प्रलंबित आहे.

Crop Damage Issue
Crop Damage : नांदेडला नुकसानीबाबत साडेसात लाख पूर्वसूचना

शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. नुकसान भरपाईसाठी अतिवृष्टीचा निकष लागू असल्याने ज्या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्याच भागातील शेतकऱ्यांना ती मिळणार आहे. तथापि काही भागांतील नुकसान हे सततच्या पावसाने झाले असल्याने व सतत पावसाचा निकष भरपाईसाठी नसल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागातील स्थिती

बाधित तालुके ३७

बाधित गावे ७६७

मृत व्यक्ती ५५

(अमरावती १३, अकोला १२, यवतमाळ १२, बुलडाणा ११, वाशीम ७)

खरडून गेलेले शेती क्षेत्र १४७९ हेक्टर

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान २ लाख ५२ हजार ८३९ हेक्टर

गाळ साचून नुकसान १६३ हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com