Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची पुन्हा दमदार हजेरी

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सोमवारी (ता. ३) मॉन्सूनपूर्व पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण पावसाळी बनले.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सोमवारी (ता. ३) मॉन्सूनपूर्व पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली.त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण पावसाळी बनले. दरम्यान मंगळवारी (ता. ४) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

जिल्ह्यात ११ मे पासून २४ मे पर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.दरम्यान गेले पाच सहा दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाटसदृश्य वातावरण होते. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. परंतु सोमवारी ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.

दरम्यान दुपारी एक वाजेपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. काही भागात किरकोळ गडगडाट झाला. मात्र मॉन्सूनप्रमाणे पावसाच्या सरींचा वर्षाव झाला.

वैभववाडी तालुक्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळल्या काही भागात अर्धा तास पाऊस झाला. कणकवलीत विजांचा गडागडाट झाला. परंतु पावसाच्या हलक्या सरी झाल्या. सावंतवाडी तालुक्याच्या बहुतांशी भागात पावसाळी वातावरण होते. सायकांळी चारच्या सुमारास सर्वत्र पाऊस झाला.

काही भागात रिमझिम पाऊस सुरू होता. किनारपट्टी भागात देखील पावसाचे वातावरण होते. या पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला होता.दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तापमान वाढल्याने उकाडा प्रचंड जाणवत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT