Pre-Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाचा अकराशे हेक्टरला फटका

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात दीडेशहून अधिक घरांची पडझड; १३ जनावरांचा मृत्यू
Crop Damage
Crop DamageAgrowon

Solapur News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसासह वादळाने थैमान घातले असून, या आधीच वादळी वाऱ्याने दोन हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला असताना, गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा वादळी वाऱ्याने दणका दिला आहे.

त्यात जिल्ह्यातील १६५ घरांची पडझड झाली, तर १११४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच १२८० विजेचे खांब पडले, आठ उपकेंद्रे बंद पडली आहेत. त्याशिवाय या आपत्तीत १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील शेतीचेही मोठे नुकसान यात झाले आहे. या वादळी वाऱ्यात जिल्ह्यातील १६३ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील १४०, मंगळवेढा तालुक्यातील २१ आणि मोहोळ तालुक्यातील दोन घरांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील ११०६ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील एक व मोहोळ तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वादळी वारे, पूर्वमोसमी पावसामुळे मोठ्या १३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील एक हजार ११४ हेक्टरला या वादळी वाऱ्याचा फटका बसला असून, त्यामध्ये १६६७ शेतकरी बाधित झाले आहेत.

या नुकसानीत मका, ज्वारी या वैरणीच्या पिकांसह आंबा, केळी, पेरू, सीताफळ यासारख्या पिकांचा समावेश आहे. त्यात पंढरपूर तालुक्यातील ८६७ शेतकऱ्यांचे ६३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Pre-Monsoon Rain : अकोला जिल्ह्याला पुन्हा पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

माढा तालुक्यातील २५५ शेतकऱ्यांचे ११० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील २६८ शेतकऱ्यांचे १२० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. उत्तर सोलापूरातील तीन शेतकऱ्यांचे दोन हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

करमाळा तालुक्यातील ९५ शेतकऱ्यांचे ६० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील १४५ शेतकऱ्यांचे १७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढ्यातील २४ शेतकऱ्यांचे २०.७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

विजेची २६ उपकेंद्रे बंद पडली

‘महावितरण’ची जिल्ह्यातील २६ उपकेंद्रे बंद पडली. १२८० विजेचे खांब पडली आहेत. दोन हजार ५३ रोहित्रांना देखील वादळाचा फटका बसला असून, अनेक ठिकाणी रोहित्रेही जमीनदोस्त झाली आहेत. परिणामी अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला आहे, ही वीज उपकेंद्रे दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

‘महावितरण’चे ३५० व ठेकेदारांकडील ४०० कामगारांची पथके तयार करण्यात आली असून, त्यांना लागणारे विजेचे खांब, रोहित्रे, तारा व इतर साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दुरुस्तीची मोहीम दिवसरात्र सुरू आहे. आतापर्यंत १८ वीज उपकेंद्रे सुरू करण्यात यश मिळाले आहे. जिथे शक्य आहे तिथे पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अन्य कामालाही गती देण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com