Pre-Monsoon Rains : मॉन्सून पूर्व पावसाने सिंधुदुर्गसह ठाण्याला भिजवलं

Pre Monsoon Rains Update: देशाच्या विविध भागात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. कर्नाटकच्या काही भागात मॉन्सूनच्या सरी बरसल्या असून सिंधुदुर्गसह ठाण्यात मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लागली आहे.
Pre Monsoon Rains
Pre Monsoon RainsAgrowon

Pune News : देशात मान्सून दाखल झाला असून रविवारी (ता. २) कर्नाटकच्या काही भागात मॉन्सून सक्रीय झाला आहे. सोमवारी (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा काही जिल्ह्यांमध्ये मॉन्सून पूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्याप्रमाणे सोमवारी सिंधुदुर्गसह ठाण्यात मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लागली आहे.

मॉन्सूनने यंदा दोन अधीच देशात आगमन केले असून आता कर्नाटक राज्याचा काही भागात पाऊस होत आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत मॉन्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

Pre Monsoon Rains
Pre-Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाचा अकराशे हेक्टरला फटका

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यांमधील काही भागात पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सकाळी दहा वाजल्यापासून पावसाने सुरूवात केली. अचानक आलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्गकरांचा गोंधळ उडाला. हवामान विभागाने कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकणासाठी अलर्ट

तसेच हवामान विभागाने कोकणासाठी अलर्ट जारी करताना रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Pre Monsoon Rains
Pre-Monsoon Rains : छ. संभाजीनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; ८ पशूधन दगावले, ३५ कुटुंबाचा संसार आला उघड्यावर

ठाण्यासह नवी मुंबईत मॉन्सून पूर्व पाऊस

दरम्यान वाढते तापमान आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या ठाणे करांना मॉन्सून पूर्व पावसाने दिलासा दिला. ठाण्यासह नवी मुंबईच्या काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

नवी मुंबईच्या बेलापूर, खारघर, खांदा कॉलनी आणि नवी पनवेलच्या परिसरात मॉन्सून पूर्व पाऊस झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

हवामान विभागाचा अलर्ट

दरम्यान हवामान विभागाने पालघर आणि ठाण्यासाठी उष्ण, व दमट हवामानाचा येलो अलर्ट दिला आहे. तर सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देताना येलो अलर्ट जारी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com