Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : संत तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखींचा पुणे शहरात प्रवेश; वाहतुकीत मोठे बदल

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लाखो वारकऱ्यांच्या मांदियाळीत आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. संत तुकारामांच्या पालखीने शुक्रवारी (ता.२८) तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदी येथून शनिवारी (ता.२९) सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. त्यानंतर आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरात रविवारी (ता.३०) प्रवेश करणार आहे. त्याअनुशंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. तर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम पुण्यात रविवारी होणार आहे. तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी पुण्याच्या दिशेने निघाली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही सोहळ्यातील वारकरी पुण्यामध्ये एकत्र येतील. यापार्श्वभूमिवर जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. तसेच प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असेही आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाहतुकीसाठी बंद असणारे मार्ग?

बोपोडी चौक, खडकी रेल्वे स्थानक, मरिआई गेट चौक, कमल नयन बजाज चौक, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील वाकडेवाडीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल.

कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक मार्गावरील वाहतूक देखील संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी बंद असेल. तर येरवड्यातील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक देखील बंद करण्यात आला आहे.

तसेच चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. तर आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद चालू करण्यात येतील. तर इतर रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.

पाच हजार पोलिसांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी पुणे शहरात रविवारी दाखल होणार आहे. त्यानिमित्ताने वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिसांनी नियोजन केले असून शहरात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असणार असून गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून मनोरे उभे करण्यात आले आहेत.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी श्रीरामपुरात दाखल

दरम्यान आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी व दिंडी श्रीरामपूरमध्ये दाखल झाली. यावेळी विठू नामाच्या गजरात जुन्या संगमनेर नाक्याजवळ पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

संत शेख महंमद महाराज पालखीचे प्रस्थान ८ जुलैला

तर हिंदू-मुस्लिम एक्याचे प्रतीक असणाऱ्या संत शिरोमणी शेख महंमद महाराज पालखीचे देखील आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. संत शिरोमणी शेख महंमद महाराज पालखीचे ८ जुलैला पंढरपूरकडे श्री क्षेत्र वाहिरा (ता. आष्टी) येथून प्रस्थान होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain : राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

Agriculture Intercropping System : मिश्रपीक पद्धतीत सेंद्रिय खतांवर भर

Maharashtra Rain : बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सरासरी गाठणार

Monsoon Fishing : पावसाळ्यातील मासेमारी बंदी महत्त्वाची...

Agriculture Pest Management : पैसा, वाणी, बहूपाद किडीचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT