Rural Development: जलजीवन मिशन, हर घर जल व स्वच्छ भारत मिशन या योजना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करणे आवश्यक आहे..प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी सांगितले की, परस्पर समन्वय साधून सुरू असलेल्या कामांना गती देणे आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा पोहोचविणे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..Government Schemes: शासन जनतेच्या दारी; योजनांचा थेट लाभ.ज्या ठिकाणी जलजीवन मिशनची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, तिथे तातडीने कामांना प्रारंभ करावा. योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळजोडणी देणे हा उद्देश असून त्यामुळे गावातील सर्व कुटुंबांपर्यंत सुरक्षित व स्वच्छ पाणी पोहोचवले जाईल. घरोघरी नळजोडणी उपलब्ध झाल्यामुळे महिलांना पाण्यासाठी करावा लागणारा प्रवास कमी होईल आणि वेळेची बचत होईल..Construction Workers Welfare: बांधकाम कामगारांच्या मुलींच्या भविष्यासाठी सरकारकडून मिळणार १ लाखांची एफडी योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती.जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १ हजार ५७४ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून नळजोडणी देण्यात आली असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे १८८ योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे १८ योजना पूर्ण झाल्याचे माहिती देण्यात आली. मानोरा तालुक्यातील हर घर जल अंतर्गत ६ गावांतील कामे ३१ मार्चपर्यंत प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले..काही तालुक्यांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाले असून इतर प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. सभेला जलसंधारण, वनविभाग, पाटबंधारे, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आणि समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.