Ashadhi Wari 2024 : इंद्रायणी नदी प्रदुषणमुक्त करण्याचे सरकारचे धोरण; मुख्यमंत्री शिंदे 

Chief Minister Eknath Shinde : हरिनामाच्या जय घोषात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी पंढरपूराकडे प्रस्थान केले. तर संत तुकाराम महाराज आणि तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे प्रस्थान शनिवारी दुपारनंतर होणार आहे.
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : हरिनामाच्या जय घोषात राज्यातील वारकरी पंढरपूरची वाट धरत आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदुषणावर वक्तव्य केले आहे. यावेळी शिंदे यांनी, आपण स्वत: इंद्रायणी नदीवर होणाऱ्या वारीच्या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदीच्या प्रदुषणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. यादरम्यान जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं शुक्रवारी (ता.२८) रवाना झाली. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे प्रस्थान शनिवारी दुपारनंतर होणार आहे. 

पायी आषाढी वारीला सुरूवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. तर टाळ-मृदुगांच्या तालावर वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने पडत आहेत. यादरम्यान इंद्रायणी नदीच्या प्रदुषणावर प्रश्नचिन्ह उभा झाला असून इंद्रायणी प्रदुषण मुक्त कधी होणार? इंद्रायणीचे स्नान मिळणार का? असे प्रश्न वारकरी उपस्थित करत आहेत. 

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 : शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी, आपण स्वत: इंद्रायणी नदीवर जाणार असून तेथे जाऊन पाहणी करू असे म्हटले आहे. तसेच प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि पिंपची-चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना करू, असेही म्हटले आहे. तसेच राज्य सरकारला वारकऱ्यांची काळजी आहे. इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदुषणमुक्त करण्याचे सरकारचे धोरण असून सरकराची भूमिका देखील अशीच आहे. त्याप्रमाणेच सध्या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणावर काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. 

जगद्गुरु संत तुकाराम महाराज 

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला शुक्रवारी सुरूवात झाली. यंदा पालखीचे ३३९ वे वर्ष असून याला फार महत्व आहे. तर पालखीचा पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात झाला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी 

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे प्रस्थान शनिवारी होणार आहे.  देऊळवाड्यातून प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम आळंदी होणार आहे. याची सर्व तयारी पूर्ण झाली असून ३० जूनला श्रींचा पालखी पुणे मार्गे पंढरीकडे मार्गस्थ होईल.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दोन दिवसात प्रस्थान

संत एकनाथ महाराजांची पालखी 

तर राज्यातील मानाच्या सात पालख्यांपैकी पैठणाची तिसऱ्या क्रमांकाची संत एकनाथ महाराजांची पालखी आहे. श्रींची पालखी शुक्रवारी सायंकाळी पैठण इथल्या नाथ मंदिरातून वाजतगाजत निघाली. यावेळी यंदा चांगला पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट हटू दे, अशी मनोकामना शेतकऱ्यांसह वारकऱ्यांनी एकनाथ महाराजांच्या चरणी केली.

इंद्रायणी नदीकाठ वारकऱ्यांनी फुलला

देहू येथील मुख्य मंदिर, वैंकुठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी नदीकाठ पहाटेपासूनच वारकऱ्यांनी फुललेला होता. पहाटेपासून इंद्रायणी नदीकाठी आंघोळ करून भाविक दर्शनासाठी जात होते. त्यामुळे नदी काठावर मांदियाळी दिसत होती. 

गजानन महाराजांची पालखी परभणीत दाखल

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे अनेक पालख्या पायी निघाल्या आहेत. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी देखील पंढरपुरकडे रवाना झाली आहे. या पालखीला मोठा मान असून मागील ५५ वर्षांपासून महाराजांची पालखी पंढरपुरला जात असते. विदर्भातुन निघालेली पालखी मराठवाडामार्गे हिंगोली जिल्ह्यात तीन मुक्कामनंतर आता परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com