Ashadhi Wari 2024 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दोन दिवसात प्रस्थान

Pandharpur Ashadhi Ekadashi Wari : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या लाखो वारकऱ्यांची पावले पंढरपुरच्या दिशेने चालत आहेत. 
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024Agrowon

Pune News : विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरची वाट धरतात. तर वर्षातून चार वेळा म्हणजेच चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पंढरपुरमध्ये एकत्र येतात. यापैकी एक पायी आषाढी वारी असून यंदा १७ जूलैला आषाढी एकदशी आहे. यादरम्यान अनेक मानाच्या पालख्या निघाल्या असून काही येत्या दिवसात मार्गस्थ होतील. जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी (ता.२८) तर श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी शनिवारी (ता.२९) रोजी प्रस्‍थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी राज्‍यातूनच नव्‍हे तर देशाच्‍या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येत असतात. 

या 'चार' पालख्या मार्गस्थ 

राज्यभरातील लांब पल्ल्यांच्या पालखीमध्ये संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा समावेश आहे. या पालखीचे २० जून त्र्यंबकेश्वर नाशिक येथून प्रस्थान झाले. तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मोठे बंधू निवृत्तिनाथ महाराज यांचे वारकरी संप्रदायामध्ये एक वेगळे स्थान आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमधील संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे १८ जून रोजी कोथळी मुक्ताईनगर येथून प्रस्थान झाले. तर १४ जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. तसेच विदर्भाची (कौंडिण्यपूर , अमरावती) पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे माहेर असणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडिण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारीचे आज ११ जूनला प्रस्थान झाली आहे. पायी पालखी दिंडी सोहळा गेल्या ४३० वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari : आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर कामे पाच जुलैपर्यंत पूर्ण करा

तसेच पंढरपूरकडे निघालेल्या अनेक पायी दिंडीपैकी संत नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे कूच केली आहे. संत नामदेव महाराजांची पालखी बुधवारी (ता.२६) हिंगोलीच्या नर्सी (नामदेव) गावातून निघाली असून गुरूवारी (ता.२७) पालखीचा पहिला रिंगण सोहळा रामलीला मैदानावर पार पडला.  

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी काटेकोर नियोजन करा : जिल्हाधिकारी सालीमठ

संत सोपानदेव महाराज (सासवड, पुणे )

आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होऊन २ जुलै रोजी सासवड येथे आगमन होणार आहे. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र सासवड येथून ३ जुलै रोजी प्रस्थान होणार आहे

पालखी सोहळ्यातील दिंड्यांना २० हजार रुपये 

यंदा शासनाने पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला. त्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुदानाची घोषणा केली. या निर्णयाचं स्वागत वारकरी संप्रदायाने केले आहे. या निर्णयाचा सुमारे १५०० दिंड्यांना लाभ होणार आहे.

राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता 

दरम्यान देशासह विदेशातील लोकांना भूरळ असणाऱ्या आषाढी वारीत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी १३ किंवा १४ जुलैला सहभागी होण्याची शक्यता असल्याचे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. तर राहुल गांधी माळशिरस तालुक्यातील माळशिरस ते वेळापूर मार्गावर वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com