Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Attack : वन विभागाचे अधिकारीही बिबट समस्येमुळे हतबल

Forest Department : नारायणगाव, वारूळवाडी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी क्वचित एकटे दिसणारे बिबटे आता दिवसाही दोन ते तीनच्या संख्येने फिरताना दिसत आहेत.

Team Agrowon

Pune News : नारायणगाव, वारूळवाडी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी क्वचित एकटे दिसणारे बिबटे आता दिवसाही दोन ते तीनच्या संख्येने फिरताना दिसत आहेत. बिबट्यांचे मानवावर वाढलेले हल्ले विचारात घेता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता शेतकऱ्यांबरोबर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी देखील हतबल झाले आहेत.

गुरुवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजता वारूळवाडी येथील सुरेश वऱ्हाडी यांच्या शेतात बिबट्या बसून होता. येथील तुकाराम निंबारकर यांच्या गोठ्याभोवती दोन बछड्यांसह मादी फिरताना दिसून आली. मागील आठवड्यात येथील सुरेश भुजबळ यांच्या ओट्यावर रात्री दहाच्या सुमारास बिबट्या बसल्याचे दिसून आले.

मीना नदी, डिंभे डावा व मीना पूरक कालवा लगत असलेल्या नारायणगाव, वारुळवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद परिसरातील कोल्हे मळा, नारायणवाडी, दरंदळे मळा, औटी मळा, चिमणवाडी, मांजरवाडी, देवजाळी परिसरात वर्षभरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात सहा शेतकरी व मेंढपाळांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत.

शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. येथील महामार्गावर वाहनांची धडक बसून दहा बिबटे मृत झाले. वन विभागाने पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात आले. तरीही बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. बिबट्यांची नसबंदी करा, हल्ला करणाऱ्या बिबट्यांना गोळ्या घाला, आमची बिबट्यांच्या त्रासापासून सुटका करा, अशी मागणी शेतकरी वारंवार करत आहेत.

मात्र वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार हे करणे शक्य नाही, अशी भूमिका वनविभागाच्या वतीने सांगितली जात आहे. एका बाजूला बिबट बंदोबस्त करणे व दुसऱ्या बाजूला शेतकरी, राजकीय नेते यांच्या रोषाला सामोरे जाणे, या अवस्थेमुळे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे काही अधिकारी व कर्मचारी बदलीसाठी प्रयत्नशील आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Petrol Pump Closure: बुलडाणा जिल्ह्यात निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद

Onion Prices Issues: बागलाण तहसीलमध्ये कांदा दरासाठी ठिय्या

Medical Shop Strike: औषध विक्रेत्यांचा आज संप

Jal Jeevan Mission: नळ पाणी योजनांच्या कामांना गती द्या : आमदार यड्रावकर

Underwater Tourism: सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात ‘गुलदार’ची भर

SCROLL FOR NEXT