
Leopard Attack News पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ले वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर धामणी वनपरीमंडल अधिकारी वनपाल सोनल भालेराव व रेस्क्यू मेंबर यांनी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या विविध गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याविषयी (Leopard Attack) व त्यापासून स्वतः व प्राण्यांचे संरक्षण कसे करावे, या बाबत फ्लेक्स लावून जनजागृती करण्यात येत आहेत.
सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बिबट राहण्याची जागा बदलत आहे. परिणामी, बिबट्यांचा रस्त्यावर अपघाती मृत्यू होऊ लागले आहे.
वाहनचालकांनी रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना खबरदारी घ्यावी. तसेच गावातील नागरिकांनी या बाबत सतर्क राहून कोठेही बिबट्या आढळल्यास किंवा प्राण्यांवर हल्ले झाल्यास वनविभागाचे कर्मचारी यांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन धामणी वनपाल सोनल भालेराव यांनी केले आहे.
या गावात केली जातेय जनजागृती
तालुक्यातील धामणी, खडकवाडी, मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, शिरदाळे, पहाडदरा जारकरवाडी, पारगाव, लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक पोंदेवाडी आदी गावांच्या मुख्य चौकात फ्लेक्स लावले आहेत. त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सूचना :
- कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये. त्याला जखमी करू नये. तो उलटा हल्ला करू शकतो.
- मुलांना एकटे सोडू नये. मुलांनी घोळक्याने फिरावे.
- अंधारात एकटे फिरताना, परसाकडे जाताना गाणी म्हणा, बोला किंवा बरोबर रेडिओ लावून जावे.
- बिबट्या दिसल्यास जोरात ओरडा करावा. खाली वाकू नये. किंवा ओणवे झोपू नये. त्याचा कधीही पाठलाग करू नये. रात्री उघड्यावर झोपू नये.
- सायंकाळी व रात्री अनावधाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समूहाने फिरावे.
- लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. एकट्याला सोडू नये.
- गावाजवळील मोकाट कुत्रे, बकऱ्या व डुकरे यांची संख्या कमी करणे आपल्या हिताचे आहे.
- गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी.
- बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास नजीकचे वनपरिक्षेत्र कार्यालयास संपर्क साधावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.