Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : जालन्यात रोज पडतेय टँकर संख्येत भर

Water Issue : गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Jalna News : गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जालना शहरालाही आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासून रोज टँकरमध्ये भर पडत असल्याचे चित्र आहे.

आज घडीला तब्बल १२४ टँकरद्वारे ६७ गावांसह २६ वाड्यांना आणि भोकरदन शहरातील काही भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी दोन लाख आठ हजार ८७५ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील साडेतीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात अजून भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.  

गतवर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाला. त्यामुळे मध्यम प्रकल्पांसह लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. आज घडीला जिल्ह्यातील ५७ लघुप्रकल्पांसह सात मध्यम प्रकल्पांत केवळ पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयही कोरडा पडला आहे.

त्यामुळे जालना शहरालाही आठ ते दहा दिवसांआड जायकवाडी धरणाच्या पाण्याता पुरवठा होत आहे. त्यात नदी-नाले कोरडे असल्याने आणि मध्यम, लघुप्रकल्प ही कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईत मोठी भर पडली आहे. शिवाय अल्प पावसामुळे जिल्ह्यातील पाणीपातळी तब्बल पावणेदोन मीटरने खालावली आहे.

त्यामुळे कूपनलिकाही कोरड्या पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भोकरदन शहरातील काही भागासह जिल्ह्यातील ६७ गावांसह २६ वाड्यांना प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. परिणामी आज घडीला जिल्ह्यात १२४ टँकर सुरू झाले आहेत.

यात सर्वाधिक टँकर हे भोकरदन तालुक्यात ३१ आणि शहरात २५ असे एकूण ५६ सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरवातील जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पुढील साडेतीन महिन्यांत यापेक्षा अधिक भयावह पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT