Water Crisis
Water Crisis Agrowon

Water Crisis : पुणे जिल्ह्यात १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू

Water Scarcity : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत.
Published on

Pune News : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील पुरंदर व बारामती भागांतील १५ गावे व ९९ वाड्यावस्त्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मागील वर्षी मॉन्सूनचे उशिरा आगमन झाले होते. मात्र अधूनमधून पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे १०० टक्के भरली होती. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागात पावसाळ्यातही टॅकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती.

Water Crisis
Water Crisis : कांदापीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

प्रामुख्याने पुरंदरमधील राजुरी, रिसे पिसे या गावांत पावसाळ्यात टॅकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होऊ लागली आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांत टँकरच्या संख्येमध्ये वाढ होऊन पाणीटंचाई अधिक भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Water Crisis
Water Crisis : उमरगा, लोहारा तालुक्यांतील बारा तलाव कोरडे

गेल्या वर्षी याच काळात पाण्याची फारशी अडचणी आलेली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात एकही टॅकर सुरू नव्हता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पाण्याची समस्या भीषण असल्याने टॅकरच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. गेल्या आठवड्यात १० गावे व ६१ वाड्यावस्त्यांवर १२ टॅकरने पाणीपुरवठा सुरू होता.

यात शासकीय ९, खासगी ३ टॅकरचा समावेश होता. सध्या जिल्ह्यात शासकीय ९, तर खासगी १० टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हा पाणीपुरवठा पुरंदर, बारामती भागांतील गावांमध्ये सुरू आहे. इतर भागांतही पाणीटंचाई भेडसावण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘माझ्याकडे अडीच एकर शेती आहे. सध्या दीड एकरावर पॉलिहाउस आहे. पाण्यासाठी असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई चांगलीच जाणवत आहे. येत्या काळात शेतीसाठी तसेच पिण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागणार आहे.
- प्रमोद टिळेकर, फूल उत्पादक शेतकरी, दिवे, सासवड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com