Increase Toll Tax rates Agrowon
ॲग्रो विशेष

Increase Toll Tax rates : दूध दर वाढीबरोबरच महामार्गावरील प्रवासही महागला

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशात सध्या सर्वसामान्य जनता महागाईचे चटके सोसत असतानाच गुजरातच्या अमूलने दुधाच्या दरात २ रूपयांनी वाढ केली. यापाठोपाठ आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानाने (NHAI) देखील टोल दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राधिकरणानाने सरासरी तीन ते पाच टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे सोमवार पासून महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना वाहनधारकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ही दर वाढ सोमवार रात्रीपासूनच लागू होणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काहीच तासानंतर संपनार आहे. मंगळवारी (ता. ४) लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. याच्याआधी मात्र देशातील सर्वसामान्यांचा निकाल महागाईने लावला आहे. देशात सर्वसामान्य जनता महागाईने सध्या होरपळत असतानाच पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानाने गेल्या दोन महिन्यापासून वाढीव टोल दरांची अंमलबजावणी प्रलंबित ठेवली होती. तर ही दर वाढ फक्त लोकसभा निवडणुकांमुळे बाजूला ठेवली होती. हेच आता समोर येत आहे.

प्रक्रियेचा एक भाग

या संदर्भात, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ होतच असते. हा प्रक्रियेचा एक भाग असून याआधीच दर वाढ झाली असती. मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यामुळे मधल्या काळात यामुळे टोल दरवाढ झाली नाही.

पण आता ३ जून २०२४ पासून टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली जाणार असून देशभरातील १,१०० टोल नाक्यांवर सोमवार रात्री पासून टोल दरवाढ होईल असेही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टोल दर वाढी आणि इंधन उत्पादनाच्या करातील वाढीमुळे राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारासाठी मदत मिळते. मात्र विरोधक आणि अनेक वाहनधारक, वाहन चालक हे दर वाढीवर टीका करतात. तर टोल आणि इंधन उत्पादनाच्या करात वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक खर्चात वाढ होऊन प्रवाशांवर बोजा पडतो असे म्हणतात असेही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारताने गेल्या दशकात राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. या रस्त्यांची लांभी १४६,००० किलोमीटर आहे. जे जगातील दुसरे सर्वात मोठे रस्ते नेटवर्क आहे. याआधी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५४० अब्ज रुपये टोल संकलन झाले होते. जे आर्थिक वर्ष २०१८-१९ पेक्षा जादा असून ते २५२ अब्ज होते.

यादरम्यान गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमुल दुधाच्या किंमतीत देखील वाढ केली आहे. अमूलने दोन रुपयांची वाढ केली असून ती सोमवार (ता.३) पासून लागू होईल. अमूलच्या या घोषणेमुळे दुधाच्या किंमती वाढल्या असून आता इतर दूध संघ देखील दर वाढ करण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT