Toll Plaza And Fastag : आता टोलनाक्यांवरची थांबणार टोलवसूली; गडकरींनी स्पष्ट केली नवी योजना

Union Minister Nitin Gadkari : महामार्गांवर अनेक ठिकाणी टोल नाके उभारलेले असून येथे टोलवसूली केली जाते. तर वाहनावर फास्टॅग असल्यास ती आडवली जात नाही. पण आता टोल नाके हद्दपार होतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
Toll Plaza And Fastag
Toll Plaza And FastagAgrowon
Published on
Updated on

Pune News :  टोल नाके आता हद्दपार होतील. तर येथे होणारी टोल वसूली थांबेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी ही घोषणा X प्लॅटफॉर्मवर बुधवारी (ता.२७) केली. तसेच गडकरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकार लवकरच महामार्गावरील टोल बंद करून नवीन सॅटेलाइट टोल वसुली यंत्रणा करणार आहे. या नव्या योजनेमुळे थेट बँक खात्यातून पैसे कापले जातील. तर महामार्गावर जितके अंतर कापले जाईल तेवढेच शुल्क आकारले जाईल. याद्वारे वेळ आणि पैसा वाचेल. 

तसेच गडकरी यांनी, भारतमाला परियोजनेतून सुमारे २६,००० किमीचे आर्थिक कॉरिडॉर विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तर गोल्डन चतुर्भुज (GQ) आणि उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम (NS-EW) कॉरिडॉर हे २०२४ पर्यंत देशाच्या भविष्यात क्रांती घडवतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Toll Plaza And Fastag
Union Minister Nitin Gadkari : आरएसएसनंतर आता गडकरी यांची शेतकरी आंदोलनावर टीका; म्हणाले, 'आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित'

तसेच या नव्या प्रणालीमुळे टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. 

वाढत्या टोल तक्रारींबाबत गडकरी म्हणाले, महामार्ग हे वेळ आणि इंधनाची बचत करतात. "पूर्वी, मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी नऊ तास लागायचे. पण आता हा प्रवास २ तासांवर आला आहे. महामार्गामुळे सुमारे ७ तासांची प्रवास आणि डिझेलची बचत होत आहे. तर हे माहामार्ग सार्वजनिक-खासगी गुंतवणुकीतून केले जात आहेत. यामुळे साहजिकच थोडीफार रक्कम आपल्या मोजावी लागणारच. 

फास्टॅगवर गडकरी म्हणाले 

सध्या टोल नाक्यांवर टोल वसूली केली जाते. तर फास्टॅग प्रणालीद्वारे देखील टोल टॅक्स घेतला जातो. ही इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली असून ती स्वयंचलित आहे. यावरून गडकरी म्हणाले, फास्टॅग प्रणालीमुळे टोल नाक्यावरील प्रतीक्षा करण्याचा वेळ कमी झाला आहे. तो सरासरी ४७ सेकंदांवर आला आहे. जो पूर्वी सरासरी ७१४ सेकंद होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com