Namdeo Dhondo Mahanor Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajit Bhalerao : महानोरांच नाव कवितेतही आणि मातीतही मोठं होते !

Article by Indrajit Bhalerao : महानोर ही वाङ्‍मयातली एक शक्ती होती. कवितेतही आणि गीतातही त्यांनी मोठं नाव कमावलं.

Team Agrowon

इंद्रजित भालेराव

N. D. Mahanor : महानोर ही वाङ्‍मयातली एक शक्ती होती. कवितेतही आणि गीतातही त्यांनी मोठं नाव कमावलं. आमचे रावसाहेब जामकर फार भाबडेपणानं म्हणायचे, ‘‘लता मंगेशकर ना. धों. महानोर यांच्याशिवाय कुणाचीच मराठी गाणी गात नाहीत.’’ सामान्य माणसांपर्यंत हाच संदेश गेलेला असावा. हे खरं होतं, की लताबाईंनाही महानोरांच्या कवितेची भुरळ पडलेली होती.

पुढं मराठीमध्ये लोकप्रिय व्हायचं असेल, विशिष्ट दर्जा ठेवून लोकप्रिय व्हायचं असेल, तर महानोरांची गाणी किंवा कविता गायला मिळणं हे प्रतिष्ठेचं समजलं जाऊ लागलं. महानोरांचे संगीतकार तसे कमीच होते. हृदयनाथ मंगेशकर, आनंद मोडक आणि निशिकांत सदाफुले यांनी प्रामुख्यानं महानोरांच्या गाण्यांना चाली दिल्या.

बऱ्याच नव्या गायकांना आणि जुन्याही गायकांना आपण महानोरांची गाणी गावीत अशी आकांक्षा होती. त्यात लता मंगेशकरपासून त्यांची भाची राधा मंगेशकर यांच्यापर्यंत हे लोण पसरलेलं होतं. जुन्या सुलोचना चव्हाण यांच्यापासून नव्या उर्मिला धनगरपर्यंत आपणाला महानोरांच्या लावण्या गायला मिळाव्यात असं वाटत होतं.

तसेच कुमार गंधर्व आणि जितेंद्र अभिषेकी यांच्यापासून ते पद्मजा फेणाणी जोगळेकरपर्यंत महानोरांच्या कविता गाव्यात अशी या सगळ्यांची इच्छा होतीच. जरी ते त्यांना आयुष्यात शक्य झालं नसलं तरीही. अशा कितीतरी गोष्टी महानोरांच्या संदर्भात आपणाला सांगता येतील.

खरं सांगायचं म्हणजे मी महानोरांचा एकलव्य होतो. त्यांच्या भोवतीच्या लोकांनी, त्यांच्या काही मित्रांनी आणि त्यांच्या जवळ गेलेल्या माझ्याही काही मित्रांनी आम्ही दोघं कसे जवळ येणार नाहीत, याच्या तजविजी कायम केल्या.

त्यामुळं मला कधीही त्यांच्या अंतर्वर्तुळात प्रवेश मिळाला नाही. पण एकलव्यासारखा मी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःला घडवत होतो. मढवत होतो. प्राणपणानं त्यांचं अक्षरन्अक्षर वाचत होतो. तेवढ्याच प्राणपणानं त्यांचा शब्दन्‌शब्द ऐकत होतो. एका अर्थाने गावखेड्यातून आलेल्या आमच्या पिढीच्या लिहिणाऱ्या, वाचणाऱ्यांचा वाटाड्या महानोर होते.

आम्ही त्यांच्याच वाटांनी गेलो असं नाही. आम्ही आमच्याही काही नव्या वाटा निर्माण केल्या. प्रत्येक पिढीचं प्राक्तन वेगळं असतं. जे महानोरांना मिळालं ते आम्हाला मिळणं शक्य नसलं, तरी जे आम्हाला मिळालं ते महानोरांना मिळणं शक्य नसतं. पण आमच्या पिढीचे काही जण महानोरांच्या वेशभूषेपासून हालचालींपर्यंत महानोरांच अनुकरण करत राहिले आणि जागेवरच कुजून गेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT