Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : परभणीतील मध्यम प्रकल्पात २ टक्के, तर लघु प्रकल्पात ६ टक्के शिल्लक पाणीसाठा

Water Issue : अनेक जलस्तोत्र आटले असून अनेकांनी तळ गाठल्यामुळे पाणी टंचाईची समस्या बिकट झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील तापमानात ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे.परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.अनेक जलस्तोत्र आटले असून अनेकांनी तळ गाठल्यामुळे पाणी टंचाईची समस्या बिकट झाली आहे.

गुरुवारी (ता. ४) पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघु तलाव कोरडे पडले असून १० तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला तर केवळ ४ तलावांमध्ये सरासरी ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता.दोन पैकी मासोळी (ता.गंगाखेड) मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून करपरा (ता.जिंतूर) मध्यम प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला.

जलप्रकल्पांतील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्यांची गंभीर होत आहे. गुरुवारी (ता. ४) घेण्यात आलेल्या पाणी पातळीच्या नोंदी नुसार जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव हे ८ लघु तलाव कोरडे पडले आहेत.

पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड), टाकळगाव (ता. गंगाखेड), भोसी (ता. जिंतूर), आडगाव (ता. जिंतूर), कवड (ता. जिंतूर), मांडवी (ता. जिंतूर), पाडळी (ता. जिंतूर) या १० लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

झरी (ता. पाथरी) तलावांत ६८ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) तलावात २७ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) तलावात २४ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात ८ टक्के मिळून ४ लघु तलावांमध्ये सरासरी २.४०६ दलघमी म्हणजेच ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी (२०२३) ४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ९.३९० दलघमी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT