Water Stock : ‘येलदरी’त ३८.४१ टक्के, तर ‘सिद्धेश्‍वर’ मध्ये ११.३६ टक्के पाणीसाठा

Dam Water Storage : कालव्याची आवर्तने, उपसा सिंचन, पाणीपुरवठा योजना, बाष्पीभवन आदी कारणामुळे या दोन धरणातील पाणीसाठ्यात घट सुरू आहे.
Water Stock
Water Stock Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील पूर्णा नदीवरील येलदरी धरणामध्ये शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८ वाजता ३११.१०९ एमएमक्यूब (३८.४१ टक्के), तर त्याखालील सिद्धेश्‍वर धरणामध्ये ९.१९६ एमएमक्यूब (११.३६ टक्के) जिवंत पाणीसाठा शिल्ल्क होता.

सिद्धेश्‍वर धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. कालव्याची आवर्तने, उपसा सिंचन, पाणीपुरवठा योजना, बाष्पीभवन आदी कारणामुळे या दोन धरणातील पाणीसाठ्यात घट सुरू आहे.

Water Stock
Water Stock : नगर जिल्ह्यात सत्तावीस टक्केच उपयुक्त पाणीसाठा

२०२३ च्या मध्ये पाणलोटात अल्प झाला. परिणामी, येलदरी धरणातील पाण्यासाठ्यात केवळ २.५ टक्के वाढ झाली होती. १ जून २०२३ पासून धरणक्षेत्रात ७१८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी (२०२२) एकूण ९०५ मिलिमीटर पाऊस झाला होता. धरणाच्या जलाशयात १ जून २०२३ एकूण ९६.०७६ एमएमक्यूब पाण्याची आवक झाली.

गतवर्षी (२०२३) ५ एप्रिल रोजी ५५७.०७५ एमएमक्यूब म्हणजेच ६८.७९ टक्के जिवंत पाणीसाठा होता. गतवर्षी (२०२२) जोरदार पावसामुळे पूर्णा नदीवरील येलदरीत खालच्या भागातील सिद्धेश्‍वर धरण पूर्ण भरले होते. यंदा या धरणाच्या कालव्याद्वारे आवर्तने सोडण्यात आली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती.

दोन दिवसापूर्वी येलदरी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सिद्धेश्‍वरमध्ये शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८ वाजता ११.३६टक्के टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी ५ एप्रिल रोजी या धरणात ३९.२३६ एमएमक्यूब (४८.४६ टक्के) पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात १ जून २०२३ पासून आजवर ९०३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Water Stock
Water Stock : वारणा धरणात १८ टीएमसी पाणी

गतवर्षी (२०२२) १२१५ मिलिमीटर पाऊस झाला होता. १ जून २०२३ पासून धरणात २१५.९९५ एमएमक्यूब पाण्याची आवक झाली आहे. १ जुलैपासून या धरणाच्या कालव्याद्वारे १४३.९१२ एमएमक्यूब पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी ४.२०० एमएमक्यूब पाणीसाठा आहे. उपसा सिंचनाद्वारे ४.१०५ एमएमक्यूब पाणी वापर झाला. बाष्पीभवनाद्वारे ०.१४५ एमएमक्यूब व्यय होत आहे.

...असा होतोय धरणातील पाण्याचा वापर

या धरणातून दररोज जिंतूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००७ एमएमक्यूब, परभणी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ०.०२८ एमएमक्यूब, सेनगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ०.००२ एमएमक्यूब पाणी वापर आहे. उपसा सिंचन योजनाद्वारे ०.००३ एमएमक्यूब वापर झाला.

बाष्पीभवनाद्वारे ०.२६१ एमएमक्यूब व इतर व्यय ०.०३१ एमएमक्यूब आहे. वीजनिर्मितासाठी ४.५४ एमएमक्यूब पाणी वापर झाला. दोन दिवसांपूर्वी सिंचनासाठी सिद्धेश्‍वर धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाणीसाठ्यात घट होऊन शुक्रवारी (ता. ५) सकाळी ३८.४१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com