Mahua Tree  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Employment : ग्रामीण भागातील रोजगाराचा कल्पवृक्ष

Mahua Tree Benefits : मोहाचे झाड हा शब्द उच्चारला की त्यापासून बनणारी दारू डोळ्यासमोर येते. पण रानावनात उगवणारे हे झाड ग्रामीण भागातील आदिवासी, गोरगरीबांना रोजगार देणारा कल्पवृक्ष ठरत आहे.

Team Agrowon

Thane News : मोहाचे झाड हा शब्द उच्चारला की त्यापासून बनणारी दारू डोळ्यासमोर येते. पण रानावनात उगवणारे हे झाड ग्रामीण भागातील आदिवासी, गोरगरीबांना रोजगार देणारा कल्पवृक्ष ठरत आहे. या झाडाची पाने, फुले, फळे, साल, लाकडाचा उपयोग केला जात असून पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा या झाडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

ठाणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. मोहाच्या झाडाची लागवड करत नाही. मोहाची फळे पिकल्यावर वटवाघाळे, पोपट, कावळे यासारखे पक्षी मोहाची फळे खातात. रानावनात पडणाऱ्या बियांपासून झाडे उगवतात.

कुठलीही मेहनतीशिवाय हे झाड शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळवून देते. तसेच पर्यावरणरक्षण पण करते. ग्रामीण भागात आजही मोहाच्या बियांपासून खाद्यतेल तयार केले जाते. मुरबाड शहरातील दोन गिरण्यांमध्ये दिवस रात्र मोहठीचे तेल गाळण्याचे काम सुरू आहे

झाडाचे गुणकारी फायदे

मोहाची फुले : मार्च-एप्रिलमध्ये झाडांना फुले येतात. फुले खाण्यासाठी गुरांची झुंबड उडते. ही फुले गोळा करून वाळवून, कुजवून त्याची दारू तयार केली जाते. अंगमेहनत करणारे शेतकरी, आदिवासी ही दारू पितात, असे स्थानिक सांगतात. फुलांच्या अर्कामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने शुद्ध दारूला जास्त मागणी असते.

फळे : एप्रिल-मे महिन्यात मोहाची फुले गळून पडल्यानंतर त्याला हिरव्या रंगाची फळे येतात. त्यांना ‘मोहदोडे’ असे म्हणतात. कच्च्या फळाची साल सुकवून वर्षभर त्याचा भाजीसाठी वापर होतो. उकडलेले हरभरे व फळांची साल खुरासनीच्या चटणीत टाकून तयार केलेल्या भाजीची चव अप्रतिम असते.

मोहोटी : मोहाच्या फळांच्या बियांना ‘मोहोटी’ असे म्हटले जाते. मोहाच्या झाडाखाली पडलेल्या बिया वेचून फोडल्या जातात. त्यानंतर सुकवून त्यापासून तेल काढले जाते. मोहोटीच्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी; तसेच ताप आल्यावर हाता-पायांच्या तळव्यांना चोळून ताप उतरवण्यासाठी केला जातो. पावसाळ्यातील गारठ्यात या तेलाचा शरीराला चांगला फायदा होतो.

पेंड : मोहोटीचे तेल काढताना बियांचा चोथा उरतो. त्याला ‘पेंड’ म्हणतात. डासांना पळविण्यासाठी वाळलेले शेण व मोहाची पेंड एकत्र करून त्याची धुरी केली जाते. धुरामुळे डास व आसपास वावरणारे साप, विंचूही पळून जातात. साबण तयार करणाऱ्या कंपन्या ही पेंड विकत घेतात. त्यापासून पुन्हा तेल काढून त्याचा वापर साबण तयार करण्यासाठी तर चोथ्याचा वापर खतासाठी करतात.

पाने : द्रोण व पत्रावळी तयार करणे. सुकलेल्या पानांची राख जखम लवकर बरी होण्यासाठी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

Flood Crop Damage : पिकांसोबत मातीही गेली वाहून

Nimboli Ark: निंबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करायचा? निंबोळी अर्काचे फायदे काय ?

Agrowon Podcast: हळदीच्या दरावरील दबाव कायम, गवारला उठाव कायम, शेवगा महागले; काकडी आवक वाढली, लसूणचे भाव स्थिर

SCROLL FOR NEXT