MPSC Student Protest Pune Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Student Protest Pune : ...अखेर एमीपीएसने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी आल्याने स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तर यातूनच पुण्यात स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी येण्यासह कृषी सेवेतील पदांचा समावेश न झाल्याने स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मंगळवार (ता.२०) पासून आंदोलन सुरू केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अखेर यश आले असून आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ पुढे ढकलण्याचा निर्यण गुरूवारी (ता.२२) घेतला. यामुळे पुण्यात आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात न आल्याने अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये रोष दिसत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस परीक्षा रविवारी (ता.२५) आयोजित होती. आयबीपीएस परीक्षा केंद्राची असल्याने त्याची तारीख बदलणे शक्य नाही.

पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलणे शक्य होते. त्यासंदर्भात याआधीच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे आयोगासह राज्य सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले होते.

त्यावरूनच विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढला होता. ज्याचा उद्रेक होऊन विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत होते. तर या आंदोलनास खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी आपला पाठिंबा दिला होता.

तर जेष्ठ नेते शरद पवार यांनी थेट सरकारला इशारा देत विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आपण आंदोलनात उतरू असे म्हटले होते. त्यानंतर आता आयोगाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत परीक्षा पुढे ढकलल्याचे म्हटले आहे.

याबाबत आयोगाने ट्विट करत माहिती देताना, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमिवर आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवी दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे.

याबरोबरच एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ही मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील २५ ऑगस्ट २०२४ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेची पुढची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळताच विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे. पण याच परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच नव्या परीक्षेत या पदांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तर विद्यार्थ्यांनी सरकारने कृषी सेवेतील पदांसह १५ हजार पदांच्या नव्या संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात आणि त्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT