Maharashtra Vidhansabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाविकास आघाडीचे प्रत्येकी ८५ जागांवर एकमत

Maharashtra Assembly Elections 2024 : महायुतीने जागा वाटपामध्ये आघाडी घेतली असतानाच महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ सुरू होता.

Team Agrowon

Mumbai News : महायुतीने जागा वाटपामध्ये आघाडी घेतली असतानाच महाविकास आघाडीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ सुरू होता. मोठा भाऊ आणि छोटा भाऊ हा वाद मिटविण्यासाठी प्रत्येकी ८५ जागांवर एकमत झाले असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाने यादी प्रसिद्ध केल्याने मोठा गोंधळ उडाला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद सुरू असतानाच शिवसेनेने ६५ जागांवर उमेदवार घोषित केले. मात्र पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत मित्र पक्षांना १८ जागा देण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या आम्ही त्यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाच्या घाईगडबडीमुळे आता प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये दुरुस्ती करण्याची नामुष्की ओढवली आहे. महायुतीच्या भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने १८२ जागांवर उमेदवार घोषित केले असतानाच महाविकास आघाडीच्या चर्चेचा घोळ बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. दिवसभराच्या चर्चेनंतर सायंकाळी सात वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आमच्यात आलबेल आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याच वेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने ६५ जागांवरील उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये मित्र पक्षांसाठी सोडण्यात येणाऱ्या जागांवर ही उमेदवार घोषित केल्याने गोंधळ उडाला ही बाब पत्रकारांनी विचारली असता खासदार संजय राऊत यांनी या यादीमध्ये तांत्रिक चुका आहेत, त्या दुरुस्त करण्यात येतील. उद्या आम्ही मित्र पक्षांशी चर्चा करणार आहोत, असे सांगितले.

शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, माहीम मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. कुडाळ मतदार संघांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात नीलेश राणे प्रवेश करत असतानाच जाहीर केलेल्या यादीमध्ये वैभव नाईक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या यादीत मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.

अमित ठाकरे मैदानात

आदित्य ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांना माहीममधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासह ४५ उमेदवारांची यादी मंगळवारी रात्री जाहीर केली.

महाविकास आघाडीचा घोळ सुरूच

गेल्या आठवडाभरापासून महाविकास आघाडीत जागावाटपाचा घोळ सुरू असून, उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागांसाठी रस्सीखेच सुरू असून वाद टोकाला गेला आहे. दरम्यान, जागावाटपाचा वाद काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिल्लीपर्यंत नेला असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात हे जागावाटपाची चर्चा करत आहेत. पटोले यांना तूर्तास बाजूला ठेवल्याचेही बोलले जात आहे. मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही पक्षांतील नेत्यांना बुधवारीच जागावाटपाचा घोळ संपविण्याचे निर्देश दिले होते. मात्र हा घोळ संपला नाही. अखेर सायंकाळी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी पवार यांची भेट घेण्याची तयारी केली तसेच संजय राऊत हेही स्वतंत्रपणे भेटण्याची शक्यता होती. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रात्रीच जागावाटप जाहीर केले जाईल. केवळ पाच जागांचा तिढा असून, तो वाद आता पक्षश्रेष्ठींपर्यंत गेल्याचे सायंकाळी उशिरा सांगितले.

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादीत

अमरावती शहरातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा खोडके यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आमदार सुलभा खोडके यांच्यासमवेत अमरावतीचे माजी महापौर शेख जफर शेखजब्बार आणि कार्यकर्त्यांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्जुनी मोरगाव, इगतपुरी, अमरावती शहर, नवापूर, पाथरी, मुंब्रा - कळवा या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. विद्यमान ३२ आमदारांमध्ये ९ मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच चार महिलांनाही उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार असून, येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ, परळीतून धनंजय मुंडे, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, अहेरीतून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिली आहे. तर श्रीवर्धन - आदिती तटकरे, अमळनेर - अनिल भाईदास पाटील, उदगीर - संजय बनसोडे, अर्जुनी - मोरगाव - राजकुमार बडोले, माजलगाव - प्रकाश सोळंके, वाई - मकरंद पाटील, सिन्नर - माणिकराव कोकाटे, खेड - आळंदी - दिलीप मोहिते, अहमदनगर शहर - संग्राम जगताप, इंदापूर - दत्तात्रय भरणे, अहमदपूर - बाबासाहेब पाटील, शहापूर - दौलत दरोडा, पिंपरी - अण्णा बनसोडे, कळवण - नितीन पवार, कोपरगाव - आशुतोष काळे, अकोले - डॉ. किरण लहामटे, वसमत - चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे, चिपळूण - शेखर निकम, मावळ - सुनील शेळके, जुन्नर - अतुल बेनके, मोहोळ - यशवंत माने, हडपसर - चेतन तुपे, देवळाली - सरोज अहिरे, चंदगड - राजेश पाटील, इगतपुरी - हिरामण खोसकर, तुमसर - राजू कारेमोरे, पुसद - इंद्रनील नाईक, अमरावती शहर - सुलभा खोडके, नवापूर - भरत गावित, पाथरी - निर्मला उत्तमराव विटेकर, मुंब्रा - कळवा - नजीब मुल्ला आदींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

SCROLL FOR NEXT